Breaking
कृषीवार्तागुन्हेगारी

विंचूर येथे कीटकनाशकांच्या दुकानात लाखाची चोरी

0 4 6 1 9 7

विंचूर येथे कीटकनाशकांच्या दुकानात लाखाची चोरी

विंचूर येथे शेती उपयोगी औषधांच्या ( कीटकनाशके ) दुकानात चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत फिर्यादीची तब्येत बरी नसल्याने उशिरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली त्यावरून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की विंचूरच्या कांदा मार्केट समोर शिवनेरी ऍग्रो एजन्सीज हे शेती उपयोगी औषधांचे दुकान आहे. हे दुकान चेतन बाजीराव सालकाडे व वाल्मीक नवनाथ चोरगे राहणार गाजरवाडी, तालुका निफाड यांनी भाडेतत्त्वावर सुरू केले आहे. दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी रात्रीतून सदर चोरीची घटना घडली. या घटनेमध्ये सुमारे 92 हजार रुपये किमतीची दोन कंपन्यांची कीटकनाशके तसेच रोख रक्कम पाकिटात ठेवलेली 15 हजार 300 रुपये असे एकूण 1 लाख 19 हजार रुपयाची चोरी झाली आहे.
या चोरीच्या घटनेबाबत दिनांक 14 एप्रिल रोजी चेतन सालकाडे यांनी लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे