Breaking
अपघातआंदोलनई-पेपरनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियशासकीयसामाजिक

बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू

0 3 2 1 2 3

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. लाडके बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी, केवायसी अपडेट करण्यासाठी तसेच इतर कामा निमित्त आलेल्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने या महिलेला सुमारे दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले होते. त्यातच कडक ऊन असल्याने महिलेला चक्कर येऊन ती खाली पडली. सदर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सुलभा भाऊराव लहानगे (राहणार आळंदी डॅम) असे या महिलेचे नाव आहे. सदर महिलाही आठ महिन्याची गर्भवती होती. तिच्यासमवेत गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. सदर महिला ही निराधार असून तिला दोन लहान मुले असल्याचे समजते.
या घटनेमुळे उमराळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही बँक आजूबाजूच्या चाळीस गावांना जोडलेली आहे. त्यामुळे या बँकेवर लोड येऊन ग्राहकांना तासंतास उभे राहावे लागते. दरम्यान, बँकेत लाडकी बहिणीचे पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी झालेला विलंब तसेच या कारणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने मयत महिलेस बँकेकडून भरपाई द्यावी अशी मागणी अनेक मान्यवरांनी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे