Breaking
क्रिडा व मनोरंजन

इंडियन आयडॉल 15 मध्ये अटीतटीच्या थिएटर राऊंडमध्ये मिसमी आणि मानसीचा दमदार परफॉर्मन्स

0 3 2 1 2 3

इंडियन आयडॉल 15 मध्ये अटीतटीच्या थिएटर राऊंडमध्ये मिसमी आणि मानसीचा दमदार परफॉर्मन्स

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उत्कंठा वाढणार आहे कारण स्पर्धक ‘थिएटर राऊंड’ मध्ये उत्तम परफॉर्म करून आपली पुढील वाटचाल सुनिश्चित करणार आहेत. परीक्षक विशाल ददलानी, श्रेया घोषाल आणि अतिथी परीक्षक नीती मोहन यांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी स्पर्धक आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. टॉप 15 मध्ये स्थान मिळवण्यासाठी होणार स्पर्धकांमध्ये चुरस. या थिएटर राऊंडमध्ये अशी जोरदार टक्कर देताना दिसतील ‘आयडॉल की जिद्दी गर्ल’ मिसमी आणि ‘आयडॉल की क्रेझी गर्ल मानसी घोष. या दोघी जणी अनुक्रमे ‘सिलसिला ये चाहत का’ आणि ‘आ जरा’ ही गीते सादर करून मंचाचा ताबा घेताना दिसतील.

गुवाहाटीच्या मिसमी बोस या गुणी गायिकेने इंडियन आयडॉलसाठी अनेकदा ऑडिशन दिली आहे. न्यूमरोलॉजीने प्रेरित होऊन तिने काही बदल केले, आपल्या नावाचे स्पेलिंग बदलले आणि शेवटी तिच्या जिद्दीचे चीज झाले. या सीझनमध्ये मोठी वाटचाल करण्यासाठी ती सज्ज आहे. थिएटर राऊंडमध्ये मिसमीने प्रत्येक सुरात जीव ओतला आणि श्रेया घोषालने तिच्या या प्रयत्नाला आणि निष्ठेला दाद दिली. तिच्या अद्भुत परफॉर्मन्सबद्दल टिप्पणी करताना श्रेया घोषाल म्हणाली, “तुझे गायन असामान्य होते! तुझ्या गाण्यात अनेक पदर होते आणि सगळे पदर तू आपल्या गाण्यात सामावून घेतले होतेस. प्रत्येक ओळीतून तुझी मेहनत आणि निष्ठा दिसत होती. तुझे कौशल्य आणि श्वासावरील नियंत्रण अप्रतिम आहे. या गाण्यात तू जीव ओतलास! मला आठवते आहे की बादशाह म्हणाला होता की तुझा आवाज निर्दोष आहे आणि मला आज ते पटले आहे. तू चुकीला वावच ठेवला नाहीस मुळी!” तिच्या सुरात सूर मिसळत विशाल ददलानीने गेल्या काही वर्षांत मिसमीने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. ती ज्या समरसतेने, तल्लीन होऊन गाते, त्याचे विशालने कौतुक केले. तर, नीती मोहनने आवाजावरील तिच्या नियंत्रणाचे कौतुक केले, खास करून अवघड लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान!

दुसरीकडे, कोलकाताहून आलेली मानसी तिच्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून तिच्या कुटुंबातील एकमेव कमावणारी मुलगी आहे. अष्टपैलू शैलीची मानसी आपल्या कुटुंबाच्या उदरभरणासाठी लाईव्ह शोजमध्ये उडत्या चालीची, मजेदार आणि सूफी गाणी गाते. मानसीने आपल्या साधेपणाने आणि भन्नाट विचारांनी परीक्षकांना आधीच प्रभावित केले आहे, मग तो ‘खाना बनाना, गाना, जलाना’ असा विचित्र छंद असो किंवा ‘शाकाहारी जेवणाचे निर्मूलन होऊन जावे’ अशी तिची इच्छा असो! थिएटर राऊंडमधल्या तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने थक्क झालेल्या श्रेया घोषालने तिच्या गायन कौशल्याची तुलना सुनिधी चौहानच्या गाण्याशी केली आणि त्याचबरोबर मानसीच्या आवाजात तिचे स्वतःचे वेगळेपण असल्याचे कौतुकही केले. ती म्हणाली, “तू लावलेले खालचे सूर आणि तुझ्या आवाजाचा अनोखा पोत यामध्ये एक टवटवीतपणा आहे, जो उठून दिसतो.” विशाल ददलानीने तिचे कौतुक करताना म्हटले, “ती इथे जिंकायला आली आहे आणि मला ही जिद्द आवडली!” आपल्या-आपल्या वेगळ्या शैलीने या दोन्ही स्पर्धकांनी परीक्षकांना प्रभावित केले. श्रेया पुढे म्हणाली, “या दोघी अगदी वेगळ्या गायन संस्कृतीतून आल्या आहेत. आणि त्यांनी अशी गाणी निवडली आहेत, जी त्यांच्या कौशल्याची आणि एकाग्रतेची कसोटी घेतात.”

प्रत्येक परफॉर्मन्सनंतर मिसमी आणि मानसीसारखे स्पर्धक नवीन मापदंड स्थापित करत आहेत. त्यामुळे ही खात्री वाटते की, हे थिएटर राऊंड नक्कीच इंडियन आयडॉल सीझन 15 मधल्या वैविध्यपूर्ण संगीत प्रतिभांवर प्रकाश टाकेल. 

बघायला विसरू नका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 चे ‘थिएटर राऊंड’ या शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे