Breaking
शासकीय

कालानुरुप बदलत्या आव्हानांना स्विकारुन महसूलची प्रतिमा उंचवावी

: जिल्हाधिकारी जलज शर्मा

0 3 2 1 2 3

महसूल सप्ताहाचा सांगता समारोप दिमाखात संपन्न

नाशिक, दिनांक 20 ऑगस्ट 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा संबोधिला जातो. या विभागाकडून नागरिकांचे प्रश्न सोडविणे, आवश्यक सेवासुविधा पुरविणे व अनेक प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. परंतु, शासकीय कार्यप्रणालीत आज अनेक बदल होतांना दिसतात. ही बदलती आव्हाने स्विकारून नागरिकांची सेवा करुन सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी महसूलची प्रतिमा उंचवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात महसूल सप्ताहाचा सांगता समारोप संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त निलेश सागर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, धान्य पुरवठा अधिकारी कैलास पवार, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, महसूल विभागात विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांमधून प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांची संख्या दिवसेगणिक वाढतांना दिसत आहे. यावरुनच महसूल विभागाचे महत्व वाढत आहे. असे निदर्शनास येते. या एक वर्षांच्या कालावधीत विविध प्रकारचे कामे केली. यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व पश्चिम विभागीय समितीची बैठकीचे नियोजन हे फार कमी कालावधीत सुयोग्य नियोजन करुन पार पाडले आहे. यात महसूल मधील अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आज येथे गौरविण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. महसूल विभागाकडून ज्या कर्मचाऱ्यांचे वय 40 वर्षांच्या पुढे आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक चाचण्या करण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

विभागीय उप आयुक्त निलेश सागर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज गावपातळी, तालूकापातळी व जिल्हा पातळीवर उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ही गौरवाची बाब आहे. साधारणत: महसूल वर्षाची सुरवात 1 ऑगस्ट पासून होते. यापुर्वी हा प्रारंभ राजस्व अभियानाच्या माध्यमातून केला जायचा. परंतु, आता इतर विभागांनाही समवेत घेऊन आपण महसूल

पंधरवाडा साजरा करतो. एक सक्षम विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने जमीनींचा 7/12 उतारा, जमीनींची मोजणी व इतर आवश्यक दाखले नागरिकांचे श्रम वाचून ऑनलाईन प्राप्त होत असल्याचे विभागीय उप आयुक्त निलेश सागर यांनी सांगितले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.जी. वाघ यांनी आपल्या मनोगतातून महसूल विभागाचा पुर्व इतिहास, कार्यपद्धती विशद केली.

या उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा झाला सन्मान
 श्रीमती हेमांगी पाटील,उपविभागीय अधिकारी निफाड
 श्री. मंदार कुलकर्णी, तहसीलदार चांदवड
 श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी, नायब तहसीलदार (निवडणूक), नाशिक
 श्री. गणेश मारग, अव्वल कारकून, तहसील बागलाण
 श्रीमती प्रिती अग्रवाल, मंडळ अधिकारी, वरखेडा, तहसील दिंडोरी
 श्री. संदिप पाटील, महसूल सहायक, तहसील कळवण
 श्री. शरद नामदेव खोडे, तलाठी, तहसील त्र्यंबकेश्वर
 श्री. गोरख सोनवणे, शिपाई, मा. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
 श्री. ज्ञानेश्वर डंबाळे, वाहनचालक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला
 श्रीमती अश्विनी जाधव, कोतवाल, तहसील नाशिक
 श्री. एकनाथ दासनोर, पोलीस पाटील, तहसील मालेगांव
या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मनित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वल करण्यात आले. उत्कृष्इ अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार कैलास सावळे यांनी केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0000000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे