*जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या नाशिक शहर कार्याध्यक्षपदी किरण घायदार यांची निवड*

*जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या नाशिक शहर कार्याध्यक्षपदी किरण घायदार यांची निवड*
नाशिक /प्रतिनिधी
जनकल्याण मराठी पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणीची बैठक निफाड येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अन्वर पठाण व बाळासाहेब अस्वले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद हे होते. यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी देविदास बैरागी यांची एकमताने निवड करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी बुलढाणा जिल्ह्य़ातील किरण मोरे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी शिर्डी येथील पत्रकार राजकुमार जाधव यांची तर राज्य सल्लागारपदी अन्वर पठाण व बाळासाहेब अस्वले यांची तर राज्य संपर्क प्रमुख पदी किरणकुमार आवारे यांची नियुक्ती करण्यात आली . महिला राज्य अध्यक्षपदी मनिषा पवार यांची निवड करण्यात आली
जनकल्याण मराठी संघ संचलीत पोलीस मित्र समिती च्या राज्य अध्यक्षपदी आनंद दाणी, दिव्यांग सेवा समितिच्या राज्य अध्यक्षपदी सुकदेव खुर्दळ, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य अध्यक्ष पदी कल्याणी धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली. जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी मच्छिंद्र साळुंके यांची तर नासिक जिल्हा अध्यक्ष पदी रामभाऊ आवारे यांची तर अहिल्यानगर च्या जिल्हा अध्यक्ष पदी संदिप काळे यांची तर गडचिरोलीच्या जिल्हा अध्यक्ष पदी जगदीश कन्नाके यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तसेच किरण कुमार आवारे यांची राज्य संपर्क प्रमुख मणुन तर योगेश कर्डिले यांची नियुक्ती सह संपर्क प्रमुख करण्यात आली. समिरशेख यांची नासिक जिल्हा उपाध्यक्ष पदी तर दिनेश पगारे यांची नियुक्ती पोलीस मित्र समिती च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष mपदी नियुक्ती करण्यात आली. नासिक शहर कार्याध्यक्षपदी किरण घायदार यांची नियुक्ती करण्यात आली. नासिक शहर उपाध्यक्ष पदावर विशाल गुंजाळ, शहर संघटक पदी फिरोज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. निफाड तालुका अध्यक्षपदी सुनिल क्षिरसागर तर दिंडोरी तालुका अध्यक्ष पदी सुरेश सुरासे, बागलाण तालुका अध्यक्षपदी सचिन सोनवणे व तालुका उपाध्यक्ष पदी हरि कृष्ण भास्कर यांची एकमताने निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी नाशिक, सटाणा, निफाड, दिंडोरी, शिर्डी, अहिल्यानगर, नांदगाव येथिल पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.