Breaking
ई-पेपरगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ड्रग्ज प्रकरणात विंचूरचे ‘बाबा’? पोलीस तपास सुरु!

0 3 2 1 2 1

विंचूर हे गाव ऐतिहासिक असून येथील भौगोलिक परिस्थितीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. तसेच सध्याच्या स्थितीत येथे असणारे वाईन प्रकल्प आणि कांदा मार्केट यामुळे विंचूरची आता औद्योगिक शहर म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली आहे. अशा शहरात अवैध व्यवसाय सुरु असल्याचे वृत्तही काही वेळा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. परंतु आता मात्र चक्क md ड्रग्ज प्रकरणात विंचूरचे नाव एका “बाबा ” मुळे आल्याने हे बाबा कोण याविषयी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु झाली आहे..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. यावेळी मालेगाव येथील रहिवासी असलेले अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू (वय 45) आणि त्यांची पत्नी शबाना अब्दुल समद अन्सारी (वय 40) यांच्याकडे एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला. यावेळी अब्दुल कडून तीन लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा 61.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज तर शबाना कडून बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा 10.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला. याशिवाय 20300 रुपयांचा इतर मुद्देमाल ही जप्त करण्यात आला. असा एकूण तीन लाख 80 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर दांपत्याची चौकशी केली असता त्यांनी निफाड तालुक्यातील विंचूर येथील एका बाबाने सांगितल्यानुसार मुंबई येथील मिरा रोड येथून एमडी आणण्याचे सांगितले. संबंधित बाबा कोण आहे याचा तपास लावला जात आहे. याबाबतचे वृत्त एका अग्रगण्य दैनिकात दिनांक 2 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे हे वृत्त पसरताच विंचूर येथील ग्रामस्थांमध्ये सदरचा बाबा कोण? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अशा गंभीर प्रकरणात विंचूर चे नाव प्रकाश झोतात आल्यामुळे विविध चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सापळा कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

पोलीस तपासात अधिक माहिती अशी मिळाली की सदरचे दाम्पत्य मुंबईहून नाशिक रोड पर्यंत रेल्वे प्रवास करून त्यानंतर खाजगी वाहन किंवा बसने मालेगाव येथे md नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुमारे वर्षभरापासून त्यांचा हा व्यवसाय सुरू होता. आपला चरितार्थ या व्यवसायाच्या माध्यमातून चालावा या उद्देशाने त्यांनी दोघांनी हा मार्ग स्वीकारला होता. नाशिक रोड ते मालेगाव या दरम्यान काही गावांमध्ये एमडी पाकिटे विक्री होत असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

5/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे