
0
3
2
1
2
3
ग्रा.पं. लासलगांव पगारदार कर्मचारी सह.पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब गिते तर उपाध्यक्षपदी तानाजी जगताप यांची बिनविरोध निवड
लासलगांव ग्रामपंचायत पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत येथील श्री. बाबासाहेब माणिकराव गिते यांची तर उपाध्यपदी श्री.तानाजी हरिभाऊ जगताप यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री.बाबासाहेब गिते यांची निवड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
लासलगांव ग्रामपंचायत पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सन २०२५-२०३० या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक २५ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपन्न झाली होती. या निवडणुकीमध्ये निवडुन आलेल्या सभासदांमधुन अध्यक्ष पदासाठी श्री.बाबासाहेब गिते यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी श्री.तानाजी जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी बाबासाहेब गिते यांच्या फॉर्मवर सुचक रोशन गायकर अनुमोदक मंगेश अहिरे तर व्हा.चेअरमन पादासाठी तानाजी जगताप यांच्या अर्जावर सुचक रुपेश पवार तर अनुमोदक चेतन सानप यांनी स्वाक्षरी केल्या. यांनी दिले तर या वेळी निवडणूक अधिकारी म्हणुन श्री.निळकंठ सावंत यांनी काम पाहिले. चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवडणुक ग्रामपंचायत लासलगांवच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर श्री.बाबासाहेब गिते यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातीस तसेच कर्ज मर्यादा वाढवणे आणि पतसंस्थेचे सभासद वाढविण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ सभासद किरण गुरव, आंबादास जाधव, प्रकाश खलसे, बळीराम घोरपडे आणि नवनिर्वाचित सभासद रुपेश पवार, ऋषीकेश वाघ, संतोष कोरे, मयुर विस्ते, रोशन गायकर, मंगेश आहिरे, चेतन सानप, आदी उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष बाबासाहेब गिते यांचा सत्कार निवडणुक निर्णय अधिकारी निळकंठ सावंत व श्री.प्रकाश खलसे व व्हा.चेअरमन श्री.तानाजी जगताप यांचा सत्कार श्री.बळीराम घोरपडे यांच्या हस्ते करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी श्री.निळकंठ सावंत यांचा सत्कार सुरेश सोनवणे यांनी केला.
0
3
2
1
2
3