Breaking
सत्कारसामाजिक

विंचूर येथील डी यु कापडणीस सर यांचा सहस्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा

सौ वत्सला दामोदर कापडणीस यांचा अमृत मोहत्सवी वाढदिवस थाटामाटात संपन्न

0 4 7 8 7 7

*श्री दामोदर उखाजी कापडणीस यांचा सहश्रचंद्र दर्शन सोहळा व सौ वत्सला दामोदर कापडणीस यांचा अमृत मोहत्सवी वाढदिवस थाटामाटात संपन्न*

**विंचूर (ता. निफाड) :** शिक्षण क्षेत्रात तब्बल ३८ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. दामोदर उखाजी कापडणीस यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. मूळचे आसखेडा (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील असलेले श्री. कापडणीस यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

१ जून १९४५ रोजी जन्मलेल्या श्री. दामोदर कापडणीस यांनी टी.डी., बी.ए., बी.एड. ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली. त्यांनी २१ जून १९६५ रोजी शिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला. न्यू इंग्लिश स्कूल, पुणतांबा, छत्रपती विद्यालय वडाळा-महादेव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर, छत्रपती शिवाजी विद्यालय वनसगाव आणि शारदा विद्यामंदिर राहाता या शाळांमध्ये त्यांनी सेवा बजावली. ३१ मे २००३ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

श्री. कापडणीस यांचा विवाह ७ मे १९६८ रोजी सौ. वत्सला दामोदर कापडणीस यांच्याशी झाला. सौ. वत्सला कापडणीस यांचा जन्म १ जून १९५१ रोजी झाला असून त्यांनी कुटुंबाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या दाम्पत्यास तीन अपत्ये आहेत. ज्येष्ठ पुत्र श्री. चेतन दामोदर कापडणीस (डी.सी.ई.) यांचा जन्म १४ मे १९६९ रोजी झाला. त्यांचा विवाह सौ. मनीषा चेतन कापडणीस यांच्याशी १५ मे २००१ रोजी झाला. त्यांना शिवप्रसाद व साहिल ही दोन मुले आहेत. शिवप्रसाद फार्मसी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेत असून साहिल अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत आहे.

कन्या सौ. संगीता अशोक भदाणे (बी.एस्सी., बी.एड.) यांचा  विवाह प्रा. डॉ. अशोक परसराम भदाणे यांच्याशी २६ जून १९९४ रोजी झाला. डॉ. भदाणे हे पंचवटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कन्या कु. उत्कर्षा भदाणे ही बी.ई. मेकॅनिकल शिक्षण घेतल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणून वडांगळी (सिन्नर) येथे कार्यरत आहे, तर कु. उन्नती भदाणे पुणे येथे नोकरी करत आहे.

धाकटे पुत्र श्री. वैभव दामोदर कापडणीस (बी.सी.एस.) यांचा जन्म १४ जानेवारी १९७५ रोजी झाला. त्यांचा विवाह सौ. सोनाली वैभव कापडणीस यांच्याशी १३ मे २००३ रोजी झाला. श्री. वैभव कापडणीस हे नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत संगणक विभागात चीफ ॲप्लिकेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कन्या कु. समृद्धी वैभव कापडणीस अभियांत्रिकी शिक्षणाच्या अंतिम वर्षात असून धाकटी कन्या कु. स्वरूपा कापडणीस शालेय शिक्षण घेत आहे.

शिक्षण, कर्तृत्व, संस्कार आणि कौटुंबिक एकतेच्या बळावर कापडणीस परिवाराने समाजात आदर्श निर्माण केला आहे. विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या या परिवाराचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हा सोहळा अपर्णा प्राईड विंचूर येथे थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्याचे सुत्रसंचलन श्री गणेश गायकवाड सर यांनी केले.

या सोहळ्यात विविध प्रकारचे कौटुंबिक खेळ घेण्यात आले. सदर सोहळ्यास मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त अधिकारी श्री संजय बोरसे, पीडब्ल्यूडीचे निवृत्त अधिकारी श्री वाय पी भदाणे, श्री सुरेश बच्छाव, श्री साहेबराव पवार, श्री जयवंत थोरात, श्री संदीप निकम, श्री संदीप देसाई, श्री भिकाजी कापडणीस, श्री तुकाराम भामरे, श्री मिलिंद कापडणीस, श्री संदीप खैरनार आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र परिवार उपस्थित होते.

2/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 8 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे