
*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात खुलतेय “नन्ही कली”*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट आणि नांदी फाउंडेशन हैदराबाद यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या गुणवत्ता विकासासाठी *नन्ही कली* हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थिनींना महिला सबलीकरणांतर्गत विविध विषयांचे ज्ञान व प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यालयातील 550 विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत असून या विद्यार्थिनींना नांदी फाउंडेशन कडून एक बॅग, शूज, दोन टी-शर्ट, दोन सॉक्स यासारखे अनेक उपयोगी साहित्य देण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सुरेखा उबाळे, पूनम सालगुडे, अर्चना बाहेकर, साक्षी सालगुडे, सोनाली टर्ले या प्रशिक्षक महिलांना देखील क्रीडा साहित्य असलेल्या बॅगा देण्यात आलेल्या असून त्याद्वारे मुलींचे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक विकास व विविध कौशल्य क्षमतांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे.
आज विद्यालयात विद्यार्थिनींना वरील साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एन . ई. देवढे, प्रमुख पाहुणे पवार सर, केंद्रप्रमुख पगार सर, पर्यवेक्षक के. जी. जोपळे, ए. टी. वळवी, पी. जी. गांगुर्डे, एस. पी. गाडेकर , एम. पी. पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन पूनम सालगुडे यांनी केले.