अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार

विळवंडी ता. दिंडोरी येथील अवैद्य दारू व अमली पदार्थ विक्री विरोधात महिलांनी दिंडोरी पोलिस स्टेशन वर मोर्चा नेऊन पो. नि. श्री. सुदर्शन आवारी यांना निवेदन दिले, उचित का्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
पोलीस ठाण्याला दिलेल्या या निवेदनात गावातील महिला व नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंता मांडण्यात आल्या आहेत. अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, कुटुंबांवर व विशेषतः महिलांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे.
प्रशासनाने त्वरित कारवाई करून गावातील सर्व अनधिकृत दारू विक्री केंद्रे बंद करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी व सामाजिक शिस्तीच्या दृष्टीने त्वरीत कारवाई होणे अपेक्षित आहे.
गावातील सरपंच श्री. विष्णू तुकाराम वाघेरा आणि गावातील नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत ग्रामपंचायतीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. प्रशासनाने यापुढे कडक उपाययोजना कराव्यात अशी महिला व इतर ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
गावकऱ्यांना आशा आहे की पोलिस प्रशासन त्वरित कारवाई करून हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणेल.