कर्मवीर विद्यालयाचा माजी विद्यार्थी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देशात प्रथम

विंचूर – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूरचा माजी विद्यार्थी, आदित्य दत्तात्रय दरेकर, याने फेडरेशन मार्फत छत्तीसगड येथे 17ते 22 जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल त्याचा व वडिलांचा विद्यालयातर्फे प्रमुख मान्यवर, डॉक्टर सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, पंढरीनाथ दरेकर अध्यक्ष सल्लागार समिती क. भा. पा. वि. विंचूर,सचिन दरेकर सरपंच ग्रामपंचायत विंचूर, विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई, सोमनाथ निकम उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, राजाभाऊ गोरे उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, जेऊघाले पी के, दत्तात्रय दरेकर, अशोक दरेकर, गायकवाड पाटील, यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघ यांच्या वतीने विद्यालयातील काही गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा यांनी केले व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी यांनी मानले, सदर कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.