Breaking
आंदोलनसामाजिक

10 सप्टेंबर रोजी रोहिले बुद्रुक येथे विविध मागण्यांसाठी मुक्ताराम बागुल यांचे उपोषण

0 4 2 9 3 8

नांदगाव ! नांदगाव तालुक्यातील जवळच असलेल्या रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी विविध मागण्या पूर्ण न झाल्यास रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत हद्दीत दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मुक्ताराम बागुल यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचात सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी निवेदनात म्हटले आहे की, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सार्वजनिक सुविधा क्रमांक तीन ते पाच जागेवरील व समोरील अतिक्रमणे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ने काढले परंतु सदर अतिक्रमण काढलेल्या ठिकाणचे मुरम व माती चे ढीग न काढता तसेच ठेवले. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाची पाणी संपूर्ण गावातून वाहून येऊन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारात तुंबून राहते. वाहून जात नाही. त्यामुळे येथे काही दिवस दुर्गंधी होते. त्यामुळे सदर पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मुरम व माती ढिग काढून चपाती करून करण्यात येऊन नालीचे खोदकाम करून गावाच्या बाहेर पाणी काढून द्यावे, रोहिले बुद्रुक गावात अनेक लोकांनी अधिक्रमण केलेले आहे. त्यामुळे बेघर असलेल्या घरकुल धारकांना जागा देण्यासाठी जागा शिल्लक राहवे कुणीही बेघर घरकुल लाभार्थी वंचित राहू नये म्हणून संपूर्ण गावातील प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण धारकांची नावांची त्यांच्या कुटुंबासह अतिक्रमणे रजिस्टर मध्ये नोंद करून त्याची नक्कल व अतिक्रमण धारकांचे दाखले मिळावे., रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या बेघर असलेल्या लाभार्थ्यांना त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही म्हणून त्वरित कार्यवाही करून घरकुल बांधकामासाठी जागा देण्यात यावी तसेच रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला योगेश डोखळे यांनी आदिवासी शेत जमीन मध्ये सर्वसाधारण गटातील व्यक्तीने कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री आलेली नसताना देखील व तसा ठराव ग्रामपंचायतीने केलेला नसताना देखील सदर जागेचा व घराचा उतारा बनवलेला आहे तरी सदरची नोंद ही चुकीची झालेली आहे. कर वसुलीच्या नावा खाली ग्रामपंचायतला चुकीचे बेकायदेशीर कामे करण्याचा अधिकार आहे का? तरी नोंद रद्द करण्यात यावी, असे निवेदन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला दिले आहे.
तसेच शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने नांदगाव पंचायत समितीने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन मधील पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने ऑनलाईन कुटुंब पत्रकानुसार व प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीला पाठवली होती. परंतु नांदगाव पंचायत समितीने सदर अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थ्यी यादी मधून अपात्र लाभार्थ्यांची नावे कमी न करता त्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये जमा केला आहे. त्यांनी शासनाचे सर्व नियम डाउनलुन व ग्रामपंचायतीने दिलेला रिपोर्ट डाउनलोड बेकायदेशीर काम केले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच रोहिले बुद्रुक येथे रोहिले बुद्रुक ते जिरी हा शिवार रस्त्याचे काम केले आहे. परंतु सदरचे कोणी केले व कसे केले हे ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांना माहिती नाही. सदरचा रस्ता अत्यंत निकृष्ट पद्धतीने झालेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्याचे खोदकाम करण्यात आलेले नाही. सदर रस्त्याची काम इस्टिमेट प्रमाणे मापानुसार करण्यात आलेले नाही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व ज्यांनी मजुरांच्या नावे पैसे काढण्यासाठी स्वाक्षरी केली आहे. व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी नांदगाव पंचायत समिती यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
तसेच रोहिले बुद्रुक येथून जाणारा नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या चे खोदकाम करून गावातून वाहून येणारे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ आवारात तुंबु नये म्हणून रस्त्याच्या कडेला नालीचे खोदकाम करून पाणी काढून द्यावे. ज्या लोकांनी अतिक्रमण केली आहेत त्यांची अतिक्रमण केल्याची यादी मिळावी. असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग उप विभाग नांदगाव यांना दिले आहे.
वरील मागण्या संदर्भात मुक्ताराम बागुल यांनी जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती नांदगाव, तहसील कार्यालय नांदगाव, पोलीस निरीक्षक नांदगाव, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व संपूर्ण संपादक व पत्रकार यांना दिलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे