Breaking
ब्रेकिंग

भुसावळ येथे तेजोदिप फाऊंडेशनची विभागीय बैठक उत्साहात

0 3 2 1 2 1

भुसावळ येथे तेजोदिप फाऊंडेशनची विभागीय बैठक उत्साहात

जळगाव – भुसावळ शहरात आज रविवार १६ रोजी तेजोदिप नवविचार फाऊंडेशनची विभागीय बैठक अध्यक्ष राजेश नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत मढी, चिरा गल्ली येथील तिसर्‍या मजल्यावर सकाळी ९ ते ११ वाजे दरम्यान सहयोगी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी फाऊंडेशनच्या मागील वर्षाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी शैक्षणिक कार्यक्रमाकरीता रुपरेषा ठरविण्याससह फाऊंडेशनचे शैक्षणिक वसतीगृह बांधकाम करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम आनंदा इंगळे, कवयित्री सीमा भारंबे, धीरज गणेश पाटील, गजानन भालचंद्र कोलते, धर्मराज देवकर, किरण बळीराम पाटील, सिद्धेश दिलीप नेहते, किरण जनार्दन पाटील, प्रणव किरण पाटील, विनायक बेंडाळे, संदीप बाळू राणे, योगेश शालिग्राम कोलते, सचिव वसंत कोलते व सुरज पाटील उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे