Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ शो चा खूप ऋणी आहे”- विनोदवीर कुशल बद्रिके

0 4 2 9 5 7

विनोदवीर कुशल बद्रिके म्हणतो, “माझे कौशल्य दाखवण्याची आणि प्रेक्षकांना हसवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ शो चा खूप ऋणी आहे.”

या वीकएंडला ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ चा फिनाले साजरा होणार आहे आणि एकदा शेवटच्यांदा आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी या शो मधले विनोद-धुरंधर सज्ज झाले आहेत. तुम्हाला जर कॉमेडी आणि मनोरंजनाचा दमदार डोस हवाहवासा वाटत असेल, तर नॉन-स्टॉप धमाल आणि एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेसने भरलेला हा भाग तुम्ही अवश्य बघितला पाहिजे.

‘नवरा बायको’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतील आणखी एक अॅक्ट सादर करताना यावेळी कुशल बद्रिके-हेमांगी कवी या नवरा-बायकोच्या जोडीसोबत यावेळी बायकोच्या आईच्या भूमिकेत अनुराधा तर बायकोच्या वडिलांच्या रुपात केतन सिंह असेल. नवरा आणि बायको यावेळी एकत्र चित्रपट बघण्याचे ठरवतात पण एक लोचट माणूस बायकोला त्रास देऊ लागतो आणि नवरा-बायकोचा बेत फसतो. नवरा तावातावाने मारामारी करायला येतो, पण त्या हाणामारीत त्याला दुखापत होते. दवाखान्यातून घरी आल्यावर तर स्थिती आणखी विकोपाला जाते, कारण नवऱ्याचे सासू-सासरे त्यांच्याकडे येऊन ठेपतात आणि नवऱ्याला अपमानास्पद शब्दांची लाखोली वाहतात. मात्र या कौटुंबिक धुमश्चक्रीत बायको हिरीरीने आपल्या आईवडीलांपासून आपल्या नवऱ्याचा बचाव करते!

या परफॉर्मन्सविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणाला, “आमच्या या ‘नवरा-बायको’ गॅगला जो उदंड हास्य-प्रतिसाद मिळाला आहे, तो पाहून मी भारावून गेलो आहे. हा प्रवास खूप छान होता आणि शेवटच्यांदा पुन्हा एकदा ‘नवरा-बायको फाइट’ सादर करताना मला आनंद होत आहे. अनुराधाजी, हेमांगी आणि केतनसोबत काम करायचे म्हणजे धमाल! त्यांची प्रतिभा आणि आमच्यातील मैत्री यामुळे प्रत्येक क्षण अविस्मरणीय झाला आहे. आम्ही एकत्र घालवलेले हे क्षण मला खूप आठवणार आहेत! ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’चा एक भाग असणे, हा माझा गौरव आहे. हा केवळ एक शो नाही, तर हा एक असा मंच होता, जेथे अनेक जबरदस्त कलाकारांना भेटण्याची व त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. माझे कौशल्य दाखवण्याची आणि प्रेक्षकांना हसवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ शो चा खूप ऋणी आहे.”

बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे