Breaking
अपघात

निफाड तालुक्यातील तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू 

0 3 2 1 1 0

निफाड तालुक्यातील तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू, 6 गंभीर

नांदगाव – नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणारा ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH 02 EE 2309) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH 41 AU 5316) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या. या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.या अपघात प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५०(B), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे