इशिता गुप्ता या सीझनमध्ये 1 करोड जिंकणारी पहिली ज्युनियर स्पर्धक असणार का?

इशिता गुप्ता या सीझनमध्ये 1 करोड जिंकणारी पहिली ज्युनियर स्पर्धक असणार का?
या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील आणि थरारक आव्हानेही पेलताना दिसतील. या सगळ्या डोकेबाज मुलांमध्ये बंगळूर, कर्नाटकातून आलेली इशिता गुप्ता ही मुलगी देखील आहे. सध्या सातवीत शिकत असलेली इशिता सगळ्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 1 करोडच्या प्रश्नावर पोहोचण्यास सिद्ध आहे.
खेळ सुरू असताना, तिने अमिताभ बच्चन यांना सांगितले की तिला फॅशनमध्ये खूप रुची आहे आणि स्किनकेअर तिच्या आवडीचा विषय आहे. तिला दर महिन्याला 500 रु. पॉकेट मनी मिळतो, जो ती वाचवते आणि मग स्किनकेअर उत्पादनांवर खर्च करते. तिने हे देखील सांगितले की तिला श्री. बच्चन यांचा फॅशन सेन्स खूप आवडतो. विशेषतः ते जे मजेन्टासारख्या काहीशा भडक रंगांचे कपडे घालतात, ते त्यांना फार शोभून दिसतात.
इशिताने विचारले, “सर तुम्ही तुमची जॅकेट कुठून आणता? ती खूप छान असतात!” यावर श्री. बच्चन यांनी उत्तर दिले, “मला हे खरोखर माहीत नाही, की ही जॅकेट कुठे बनतात! मी जेव्हा येथे कामासाठी येतो, तेव्हा सर्वसामान्यतः पायजमा आणि कुर्ता घालून येतो. पण एकदा इकडे आलो की, हे लोक मला हा पोशाख घालायला देतात. हे कपडे आमचे नसतात. ते सर्व या टीमकडून आम्हाला मिळतात. आमची कॉस्च्युम डिझाईनर प्रियाजी हे पोशाख बनवते. गेम संपला की, मी तुझी तिच्याशी ओळख करून देईन. मग तू तिला ज्या द्यायच्या त्या फॅशन टिप्स दे. फॅशन डिझाईनिंगचे तुला फारच वेड आहे.”
इशिताने बिग बींना हे देखील विचारले की ते स्किनकेअर करतात का. त्यावर बच्चन यांनी उत्तर दिले, “मी फक्त सरसोचे तेल वापरतो. त्याशिवाय काहीच नाही. तुमच्या पिढीतले लोक आजकाल या सगळ्या गोष्टी वापरता.” ते हसत हसत पुढे म्हणाले, “हे भगवान, आज की पिढी से बचाओ हमको!”
इशिता 1 करोडच्या प्रश्नाचा सामना करणार आहे. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या या छोट्या मुलीला अवश्य भेटा. अमिताभ बच्चनसोबत कौन बनेगा करोडपती ज्युनियर्स बघायला अजिबात विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!