Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेस आर्थिक मदत 

0 4 2 9 5 7

वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाळेस आर्थिक मदत

सागर निकाळे निफाड/प्रतिनिधी

तालुक्यातील पालखेड येथील कै.दामोदर धोंडीबा हिरे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाप्रसंगी कोणत्याही प्रकारचा दुखवटा न घेता तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षणप्रेमी पुत्र मंडळ अधिकारी संतोष हिरे, कैलास हिरे,विजय हिरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृति तेवत ठेवण्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य घडविणाऱ्या ज्ञानमंदिराच्या नूतन शालेय इमारतीच्या बांधकामासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश तसेच विद्यार्थ्यांसाठी वह्या,कंपास बॉक्स,पेन आदींसह शैक्षणिक साहित्य महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित,न्यू इंग्लिश स्कूल,पालखेड ता.निफाड विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक शेळके व माजी मुख्याध्यापक डी.एम.थेटे यांकडे सुपूर्त केले. सदर नाविन्यपूर्ण व विधायक उपक्रमाबद्दल पालखेड व पंचक्रोशीत एक वेगळा चांगला पायंडा पडला असून सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. याप्रसंगी मनीषा हिरे,तृप्ती हिरे,आकाश हिरे,अमोल हिरे, मुख्याध्यापक अशोक शेळके,निलेश गवांदे, दीपक देशमुख, हेमंतकुमार होलगडे, सुनंदा दुर्धवळे ,संजय लव्हांगडे, मंगेश कागदे, शैलेश शिखरे, किरण थेटे,राहुल दवते,वैशाली मोते,सागर जाधव,राजेंद्र नाठे, संदीप आहेर, दत्तात्रय पगार, सावन जाधव,संजय कोकतरे, कविता ढोमसे,सारिका पवळे,सुरेश गांगुर्डे, रामदास पवार,नदीम तांबोळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

आयुष्यात कळत-नकळत अनेकवेळा अनावश्यक खर्च होतो.अशा खर्चांबाबत सद-सद विवेकबुद्धीने विचार करावा.आमचे कुटुंब शाळा व शिक्षणासाठी सदैव मदत करण्यास कटिबद्ध असून समाजातील दानशूर व्यक्तींनीही यामध्ये सहभाग घ्यावा.

— संतोष हिरे.

–मंडळ अधिकारी, सिन्नर

छायाचित्र:- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना हिरे कुटुंबीय समवेत मान्यवर.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे