
0
3
2
1
2
3
नांदगाव नगर परिषदतर्फे कर वसुलीची धडक कारवाई; एक मालमत्ता जप्त
नांदगाव, दि.11 (मुक्ताराम बागुल):-
नांदगाव नगरपरिषद तर्फे घरपट्टी/पाणीपट्टी/गळा भाडे/जागा भाडे या कराच्या वसुलीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज पर्यंत पाणीपट्टी थकीत चे एकूण 30 नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. घरपट्टी थकबाकी पैकी नांदगाव शहरातील सुयोग कॉलनी परिसरातील एक रो हाऊस सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तरी या पथकामार्फत आत्तापर्यंत जवळपास 43% वसुली करण्यात आली आहे. थकबाकीदारांना अंतिम नोटीस सुद्धा वितरित करण्यात आल्या आहे.
नांदगाव नगर परिषदेचा कर न भरल्यास वसुली पथकामार्फत नळ कनेक्शन कट करणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्धी करणे, घरासमोर ढोल ताशांचा गजर करणे व अंतिमता मालमत्ता जप्त करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. कर्ण भरल्यास दरमहा दोन टक्के दराने शास्ती ही लावण्यात येत आहे. तोपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे कारवाई चालूच राहील असे सूचना नांदगाव नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली आहे. शामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे, कर निरीक्षक प्रमोद पवार, स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी, रामकृष्ण चोपडे, दीपक वाघमारे, सुनील पवार व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
0
3
2
1
2
3