कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गावकऱ्यांकडून शिक्षकांचा सन्मान

विंचूर: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि उपस्थित गावकऱ्यांकडून सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोरे, पी के जेउघाले, अशोक दरेकर, ज्ञानेश्वर गाडे यांनी शिक्षकांविषयीची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य देवढे एन ई,पर्यवेक्षक जोपळे के जी ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम, पंढरीनाथ जेउघाले, विनायक जेउघाले, शंकर दरेकर, नंदकुमार खैरे, पी जी ढवण सर, केशव राऊत, सतीश शेलार, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, ज्ञानेश्वर काकड, सुनिल क्षिरसागर, किरण चव्हाण, सोनाली कापडणीस, स्नेहलता साळी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिज्ञासा मुद्गुल हिने केले, तर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चांदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतनिमित्त विद्यालयातील गायत्री मुद्गुल व मयुरी मुदगुल या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तद्नंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर संपूर्ण शाळा चालवली विद्यार्थी मुख्याध्यापक शेलार अक्षरा सुनील तर विद्यार्थी पर्यवेक्षक दरेकर दिव्या युवराज यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्तम प्रकारे शाळा चालवली व शिक्षक बनण्याचा अनुभव प्राप्त केला.
सायंकाळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांमार्फत यथोचित सत्कार केला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई हे होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने श्वेता नवले, देवांग दरेकर, ऋतुजा भिडे, दिव्या मघाडे, दिव्या दरेकर, रितू पवार, यांनी शिक्षकांविषयीची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच ज्या विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर ज्ञानदानाचे काम केले. त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षिका ए. एम. पवार यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनातील शिक्षकांचे स्थान व शिक्षक दिनाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा बोडके हिने केले तर सूत्रसंचालन जिज्ञासा मुद्गुल हिने केले. संपूर्ण कार्यक्रम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक चांदे आर के व निकम के एम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शेवटी श्रद्धा जेऊघाले हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.