Breaking
सामाजिक

विंचूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन!

0 3 2 1 2 3

मातोश्री कै. हौसाबाई वामनशेठ दुसाने सार्व. वाचनालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन!

विंचूर : येथील मातोश्री कै. हौसाबाई वामनशेठ दुसाने सार्व. वाचनालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून तसेच पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रामेश्वरी देशमुख यांनी केले. तसेच जेष्ठ नागरीक महादेव वाजे यांनी आपल्या भाषणात ‘सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्यांनी मोठे कार्य उभे केले. अनेक ठिकाणी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी बांधून दिल्या. उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोईच्या सुविधा, धर्मशाळा, आश्रयशाळा बांधल्या, जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.’ असे सांगितले.
यावेळी सोमनाथ वाळेकर, विजय आहेर, भाऊसाहेब गावडे, ऋषीकेश आघाव, सुरेश शिंदे, स्वाती बगाडे, कविता शेवाळे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे