Breaking
गुन्हेगारीसामाजिक

युवकांस जीवे मारण्याचा प्रयत्न

लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल, एकास अटक

0 3 2 1 2 3

मागील भांडणाची कुरापत काढून बौद्द युवकास कोयता, चाकू, गजाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न

लासलगाव पोलीस ठाण्यात चार युवकांवर गुन्हा दाखल 

 शरद लोहकरे, लासलगाव…

मागील भांडणाची कुरापत काढून बौद्द युवकास कोयता, चाकू, गजाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात चार युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून एक मुख्य आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.

      सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विवेक केशव मोरे, वय २२ धंदा – शेती, जात – बौद्ध रा.कोळगाव, ता. निफाड याने लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित, फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात राहणारे असून त्यांचेत मंगळवार दि.१४ जाने.रोजी पैशाचे कारणावरुन वाद झाला होता.

गावातील गोदावरी फिल्टर प्लँटजवळ दि.१५ जाने रोजी दु.१ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ अजय हा गावात जात असतांना, आरोपींनी जुन्या भांडणाची कुरापत काढून अजय यास शिवीगाळ दमदाटी देवून नितीन सुनिल जाधव वय २५ याने त्याचे हातातील कोयत्याने अजय याचे डोक्यात मारहाण केली. शुभम सुनिल जाधव, याने त्याचे हातातील चाकुने अजयच्या उजव्या पायाच्या मांडीवर तसेच डाव्या हाताच्या करंगळीवर वार केला. तेव्हा फिर्यादी विवेक व त्याची वहिनी साक्षीदार सुर्वणा ही सोडविण्यासाठी मध्ये गेली असता मयुर सुनिल जाधव याने त्याचे हातातील कोयत्याने विवेकच्या उजव्या पायाचे गुडघ्यावर मारहाण केली. तसेच अभिषेक संजु साठे रा. सुभाषनगर, ता.कोपरगाव याने त्याचे हातातील लोखंडी गजाने विवेकच्या उजव्या हाताचे दंडावर, पाठीवर मारहाण केली व व फिर्यादिचे वहिनीस या सर्वच आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्या फिर्यादीवरून फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करुन कोयता, चाकु व लोखंडी गजाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून लासलगाव पोलीस ठाणे गु.रजि.न. २६/२०२५ भारतीय संहिता कलम २०२३ खुनाचा प्रयत्न कलम- १०९,११८ (१).११५( २),३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ अधिक तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे