Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘अगर आपकी आवाज में है वो दम, तो आइए इंतजार कर रहे हैं हम’, – विशाल ददलानी

0 3 2 1 2 3

विशाल ददलानी म्हणतायत… ‘अगर आपकी आवाज में है वो दम, तो आइए इंतजार कर रहे हैं हम’, पुढील इंडियन आयडलचा शोध सुरु
४ शहरांमध्ये ऑडिशनची घोषणा, कोलकाता, गुवाहाटी, दिल्ली आणि मुंबई

सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनचा प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो इंडियन आयडल हा देशभरातील महत्त्वाकांक्षी गायकांसाठी एक सर्वोत्कृष्ट मंच मानला जातो. काही सर्वात प्रतिभावान गायन प्रतिभांना जगासमोर आणण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम गायकांना राष्ट्रीय मंचावर आपले कौशल्या दाखवण्याची सुवर्ण संधी देतो. वैभव गुप्ता, ऋषी सिंह, पवनदीप राजन आणि इतर अनेक अद्भूत प्रतिभांना नवी ओळख देणारा हा मंच आता देशातील पुढील इंडियन आयडल शोधण्यासाठी सज्ज आहे.
१८ ऑगस्टची ऑडिशन कोलकाता येथील के पी.बी. अकॅडमिक स्कूल, 63 महात्मा गांधी रोड, डायमंड सिटी साउथ के बगल च्या बाजूला, टॉलीगंज, कोलकाता – 700041 येथे सुरु होईल. पुढील टप्पा २० ऑगस्ट रोजी गुवाहाटी येथील नेरिम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, पद्म नाथ सरमा भवन, त्रिपुरा रोड, जयानगर, खानापारा, गुवाहाटी, आसाम – 781022 येथे होईल. 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जेबीएम ग्लोबल स्कूल, एक्सप्रेसवे, ए-11, सेक्टर 132, नोएडा, उत्तर प्रदेश – 201301 येथे ऑडिशन असतील. फायनल ऑडिशन ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होतील. यासंबंधीचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही.
लिंक: https://www.instagram.com/p/C-p-Ku8qlxK/?hl=en

महत्त्वाकांक्षी गायकांनी ऑडिशनमध्ये भाग घेण्याचे आवाहन या मालिकेचे जज विशाल ददलानी यांनी केले असून ते म्हणाले, ‘तुम्ही खूप जोरदारपणे तयारी करत आहात, तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आला आहे. इंडियन आयडलची ऑडिशन सुरु होत आहे. आम्ही आता पुढचा मोठा स्टार शोधत आहोत. लवकरच तुमच्या जवळच्या शहरात ऑडिशन होतील. अगर आपकी आवाज में हैं वो दम… तो आइए इंतजार कर रहे है हम…’
इंडियन आयडलचा यंदाचा सीझनचा प्रवास अत्यंत विशेष होईल, असा विश्वास आहे. देशातील उत्कृष्ट गायन प्रतिभा इथे सादर केल्या जातील. इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की, आपली स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. कारण कदाचित त्यांच्यापैकीच एक भारतातील एक लोकप्रिय सिंगिंग सेंसेशन असू शकतो.
अधिक माहितीसाठी, सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनलला भेट द्या…
@sonytvofficial इथे संपर्क करा…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे