लासलगाव पोलीसांनी जप्त केले जनावरांचे 213 किलो मांस, इनोव्हा
विंचूर/प्रतिनिधी-:
213 किलो जनावरांचे मांस इनोव्हा कारमधून अवैधरित्या येवल्याकडून नाशिककडे नेत असतांना भरवसफाटा येथे लासलगाव पोलीसांना पकडल्याची कारवाई आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईत 31 हजार 950 रूपयांचे मांस तर अंदाजे 6 लाख रूपये किमतीची इनोव्हा कार लासलगाव पोलीसांनी जप्त केली असून कारमधील दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज बुधवार दि. 19 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भरवस फाटा येथे येवला बाजूकडून येत असलेली इनोव्हा क्र.एमएच 15 डीएस 6962 अडविण्यात आली असता या कारमधून सुमारे 213 किलो जनावरांचे मांस अवैधरित्या वाहून नेण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे लासलगावचे पोलीस शिपाई सुजय बारगळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचे मांस तसेच कारमधील सय्यद रफीक लतीफ (वय 39, नागजी, भारतनगर, नाशिक) व शेख माजिद अरमान (वय 40, चौक मंडी जुने नाशिक) यांना ताब्यात घेतले. तसेच अंदाजे 6 लाख रूपये किमतीची इनोव्हा किंमतीची कार देखील ताब्यात घेण्यात आली. सदरचे मांस वाहून नेत असतांना कुठलीही पशु वैद्यकीय विभागाची परवानगी घेतली नव्हती. तसेच गाडीच्या डिक्कीत व सीटवर प्लॅस्टिकच्या पिशवीत हे मांस ठेवण्यात आले होते. संशयितांवर सी.सी.टि.एन.एस. गुरनं.148/2024 भादंविक 269, 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उत्तम गोसावी, पो.हवा. हेंबाडे, तसेच घुमरे, सांगळे, निचळ आदि पोलीस कर्मचारी करीत आहेत.