गुन्हेगारी
पिता पुत्रास जबर मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
3
2
1
2
3
देवगाव येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत जबर मारहाण
जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास लोखंडी पाईप व लाथाबुक्क्क्यांनी मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना देवगाव येथे घडली.
थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी शरद परशराम मेमाणे रा.महादेवनगर हा त्याचे मालकीचे छोटा हत्ती गाडी मध्ये लोणी येथुन दोन जर्शी गाय खरेदी करुन घरी जात असताना आरोपी गोरख राजेंद्र गव्हाणे, मच्छिंद्र राजेंद्र गव्हाणे, राजेंद्र विठोबा गव्हाणे, रामदास दगु तासकर यांनी संगनमत करून जुन्या संगणमत करून भांडणाची कुरापत काढून फिर्यादी जवळ येऊन शिवीगाळ करु लागले. तेव्हा फिर्यादी गाडीच्या खाली उतरुन आरोपीत मजकुर यांना, ‘शिवीगाळ का करता?’ असे विचारत असताना मच्छिंद्र गव्हाणे याने त्याच्या हातातील पाईपने फिर्यादीचे डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच गोरख गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, रामदास तासकर यांनी फिर्यादीस जमीनीवर खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा, फिर्यादींचे वडील परशराम निवृत्ती मेमाणे हे सोडविण्यास मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन चौघा आरोपींच्या विरोधात गुरनं.८२/२०२५ भा.न्या.सं.कलम ११८(१),११५(२),३५२, ३५१(२)(३),३(५) प्रमाणे लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप शिंदे करीत आहेत.
0
3
2
1
2
3