रसलपूर, लासलगावच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
नाशिक, (जि. मा. का. वृत्तसेवा) :
समाजकल्याण विभागांतर्गत निफाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपूर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी रिक्तजागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असून वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीनस्तरावरील विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन दोन्ही वसतिगृहांचे गृहपाल एन. व्ही. मेधणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रवेशप्रक्रियेसाठीरिक्तजागा…
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपुर
प्रवर्ग | कनिष्ठ महाविद्यालय | बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय | व्यावसायिक महाविद्यालय |
विजाभज | 1 | 1 | 1 |
इमाव/ आ.दृ.अमा | 1 | 1 | 0 |
विमाप्र | 1 | 0 | 0 |
अपंग | 1 | 0 | 1 |
अनाथ | 0 | 1 | 0 |
एकूण | 4 | 3 | 2 |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव
प्रवर्ग | कनिष्ठ महाविद्यालय | वरिष्ठ महाविद्यालय |
अनुसूचितजाती | 6 | 5 |
अनुसूचितजमाती | 0 | 1 |
विजाभज | 1 | 0 |
इमाव/ आ.दृ.अमा | 0 | 1 |
विमाप्र | 1 | 0 |
एकूण | 8 | 7 |
दोन्ही वसतिगृह शासकीय इमारतीत कार्यरत असून सुसज्ज सोयी- सुविधांयुक्त इमारत आहे. निवासासह विद्यार्थ्यांना चांगल्याप्रतीचे भोजन, निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम, छत्री व गमबुट रक्कम, शैक्षणिक सहल रक्कम इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी 02550-267018 या दूरध्वनीवर व 8999391237 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूदआहे.