Breaking
क्रिडा व मनोरंजन

जिओ स्टुडिओज आणि रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

0 4 6 1 9 7

जिओ स्टुडिओज आणि रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’, या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा मान पटकावला आहे.

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई नोंदवली. त्यानंतर शनिवारी मजबूत पकड कायम ठेवत, रविवारी चित्रपटाने आणखी मोठी झेप घेत विकेंडमधील सर्वोच्च कमाई केली. रविवारी चित्रपटाने ₹१३.१० कोटी नेट कमाई करत शनिवारीच्या तुलनेत १३.५% वाढ नोंदवली. यासह, तीन दिवसांची एकूण कमाई भव्य ₹३७.०० कोटी नेट झाली आहे.

चित्रपटाच्या प्रभावी मांडणी, भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. थिएटरमधील अनुभव हा एक सणासारखा वाटत असून, महाराष्ट्रभर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाऊसफुल्ल शो आणि वाढती प्रेक्षकसंख्या हे या यशाचे प्रमुख निदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बॉक्स ऑफिस तपशील (भारत):
पहिला दिवस (शुक्रवार): ₹१२.४० कोटी
दुसरा दिवस (शनिवार): ₹११.५० कोटी
तिसरा दिवस (रविवार): ₹१३.१० कोटी
एकूण (ओपनिंग वीकेंड): ₹३७.०० कोटी नेट

प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व स्तरांतून मिळणारे कौतुक लक्षात घेता, ‘राजा शिवाजी’ आगामी दिवसांतही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे