Breaking
ब्रेकिंग

देवगाव येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

0 5 1 7 3 0

सोयाबीनला पाणी भरताना सर्पदंश; देवगावच्या शेतकऱ्याचा मृत्यू

 किरण कुमार आवारे….

शिरवाडे वाकद:- देवगाव येथील शेतकरी संजय रघुनाथ साबळे या ३७ वर्षीय युवकाचा शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
संजय साबळे हे गट क्रमांक ३४८ मधील आपल्या शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरत असताना त्यांच्या उजव्या पायाच्या करंगळीला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील यांनी त्यांची तपासणी केली. मात्र, तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शेतातील शेतीकाम करत असताना सर्पदंश होऊन झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय साबळे यांच्या मृत्यूमुळे देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे