Breaking
निवडसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी सचिन निकम

0 3 2 1 2 3

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी सचिन निकम तर कार्याध्यक्षपदी विद्याताई कसबे

नांदगाव, प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नांदगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सव साजरी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. यात पार्श्वभूमीवर नांदगाव शहरातील रेल्वे गेट जवळ असलेल्या सारनाथ बौद्ध विहार आनंदनगर येथे बैठकीची आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आनंद नगर उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी सचिन निकम, कार्याध्यक्षपदी विद्या कसबे, उपाध्यक्षपदी वाकडे ताई,सुनिता देहाडे, दीपक वाघमारे यांची निवड करण्यात आली. तर सहसचिव पदी महेंद्र जाधव, भूषण चौधरी यांची निवड करण्यात आली, असून खजिनदार पदी मिलिंद खेडकर, सह खजिनदार आनंद पवार, सजावट प्रमुख पदी नितीन पगारे, साहेबराव बनसोडे, प्रवीण गरुड, अमोल सोनवणे, मिरवणूक प्रमुख पदी सचिन सोनवणे, राकेश गरुड, रोहित बागुल, दीपक साळवे, सिद्धार्थ अहिरे, सल्लागार भूमिती पदी निर्मला केदारे, अलका रुपवते, हिराबाई शिंदे, नेहा कोळगे, आधी उपस्थित मान्यवरांची निवड करण्यात आली.
या बैठकी दरम्यान नांदगाव नगरपालिकेतील माजी नगरसेवक अरुण साळवे, अनिल जाधव, विशाल निकम, जयंत शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्यकारणीची निवड करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकारत देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे