Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

म्युझिक फ्युजन ग्रुपतर्फे रंगली जुगलबंदी मैफल

0 3 2 1 2 3

किरण घायदार, नाशिक (प्रतिनिधी) – हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या जुगलबंदी सादर करून गायक कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही सुरेल मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मै अगर कहूॅं… या गीताने प्रारंभ झाला. ऐसा ना तुम मुझे देखो…, जादू तेरी नजर…,तू मेरे सामने…, तुम्हे जो मैने देखा…, दगाबाज रे…,हवा के साथ साथ…ये परदा हटा दो… या व अशाच इतर गाण्यांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
येथील म्युझिक फ्युजन ग्रुपतर्फे शुक्रवारी (दि ९) जुगलबंदी मैफल आयोजित करण्यात आली. महाकवी कालिदास कला मंदिरात सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या या मैफलीत हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या सुरेल जुगलबंदी सादर करण्यात आल्या. आयोजक डॉ. सुजाता बर्वे यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुणे माजी सहायक पोलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, प्रभाकर शिंदे, तसेच राज ढगे, दत्ता नेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

लोकप्रिय गायक किशोरकुमार, मोहम्मद रफी, कुमार सानू तसेच गायिका आशा भोसले, अलका याज्ञिक, सुनिधी चौहान यांनी तसेच इतर लोकप्रिय गायकांनी गायलेली युगुलगीते, जुगलबंदी यांचा समावेश या मैफलीत करण्यात आला.

‌डॉ. सुजाता बर्वे यांच्यासह लीना जोशी, शैला नेरकर, गणेश जाधव, शशांक देशपांडे, डॉ. संदीप कांबळे, अतुल निकम, श्रीकांत शिंदे या गायक कलाकारांनी रसिकांच्या आवडती गाणी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदक उस्मान पटणी यांनी बहारदार निवेदन केले. विविध नव्या – जुन्या जुगलबंदींचा इतिहास त्यांनी उलगडला. तसेच अनेक किस्से सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शान हॉस्पीटल, गोविंद दंडे ज्वेलर्स आणि सोनी पैठणी हे प्रायोजक होते. तीन भाग्यवान महिला श्रोत्यांना पैठणी भेट देण्यात आली. नाशिककर रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि सुमधुर गाण्यांचा आनंद लुटला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे