Breaking
शासकीय

कृषि निविष्ठा जादा दराने विकल्यास फौजदारी कारवाई – प्रधान कृषि सचिव व्ही. राधा

ग्राहक सेवा केंद्रांना दिल्या अचानक भेटी

0 3 2 1 2 3

अतिरीक्त शुल्क आकारल्यास सामाईक सुविधा केंद्र रद्द

नाशिक, दिनांक 8 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे, खते व औषधे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे खतांची जादा दराने विक्री अथवा इतर विद्राव्य खतांचे लिंकिंग केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषि) व्ही. राधा यांनी कृषि विभाग व जिल्ह्यातील कृषि निविष्ठा संघास दिल्या.

प्रधान सचिव (कृषि) व्ही. राधा यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील सामाईक सूविधा केंद्रांना अचानक भेट दिली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कृषि आयुक्त रविंद्र बिनवडे, उप सचिव प्रतिभा पाटील, संचालक, फलोत्पादन डॉ. कैलास मोते, विभागीय कृषि सहसंचालक रविंद्र चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे समवेत होते.

जिल्ह्यातील सामाईक सूविधा केंद्र संचालकांनी कुठल्याही प्रकारच्या देय शुल्काव्यतिरीक्त अतिरीक्त शुल्क आकारल्यास सामाईक सुविधा केंद्र कायमस्वरुपी रद्द करण्याच्या सक्त सूचना व्ही. राधा यांनी यावेळी दिल्या. कृषि विभागाच्या विविध योजनांचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घेण्याच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करीत असतात. जिल्ह्यामध्ये १ रुपया पीक विमा करिता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी योजनेत सहभागी होत आहे. अशा परिस्थितीत सामाईक सूविधा केंद्रात गर्दी होते व त्याचाच गैरफायदा म्हणून शेतकऱ्याकडून अतिरीक्त शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषि विभागाने संबंधित सामाईक सूविधा केंद्रावर प्रशासनाच्या माध्यमातून निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी यावेळी दिली.

डाक विभागात‍ विमा एजंटसाठी थेट भरती;
24 जुलैला मुलाखतीचे आयोजन

नाशिक, दिनांक 8 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी विमा एजंटची मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहवे असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघ्ज्ञर नाशिक विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विमा एजंटसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असवो व तो इयत्ता 10 वी अथवा समतुल्य परिक्षा (केंद्र अथवा राज्य सरकार मान्यताप्राप्त) उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकाचे अथवा स्थानिक ठिकाणांचे ज्ञान आवश्यक आहे. सद्यस्थितीत उमेदवार हा कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा. निवड झालेल्या उमेदवारास रूपये 5 हजार चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सिक्युरिटी डीपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल नंतर IRDAI ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल व तो परवाना 5 वर्षासाठी वैध राहील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबतचे ज्ञान या आधारवर केली जाणार आहे.

वैयक्तिक लाभ योजना लाभार्थींच्या
आधार संलग्नीकरणासाठी 12 जुलैपर्यंत कॅम्प

नाशिक, दिनांक 8 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे आधार अपडेट व बँक खात्याला आधार संलग्नीकरण करण्यासाठी कार्यालयाच्या विभागीय अधिकारी पंचवटी, सातपूर, सिडको व नाशिकरोड येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी १२ जुलैपर्यंत हे कॅम्प सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. ही माहिती संजय गांधी योजना, मनपा क्षेत्र नाशिक, तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सर्व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधार अपडेट व आधार संलग्नीकरण करून द्यावे, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे