राजकिय
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
0
4
2
9
5
7
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यामध्ये आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
येवला, दि. २३ नोव्हेंबर – येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट) आणि मित्र पक्ष महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज, सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मेनरोड येथील गणपती मंदिर येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात येणार आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर येवला शहरातील बुरूड गल्ली मार्गे प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी डी जी रोड, साईबाबा मंदिर, पंडत पैठणी कॉर्नर, लक्कडकोट पैठणी, सहस्त्रार्जून मंदिर, गांधी मैदान, क्षत्रिय हॉस्पिटल, गंगा दरवाजा, पोस्ट ऑफिस, शिंपी गल्ली येथून पुढे मेनरोड, सी.डी.पटणी, बालाजी गल्ली, नपा रोड मार्गे आझाद चौक येथून टिळक मैदान येथे येऊन समाप्त होईल. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट) आणि मित्र पक्ष महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0
4
2
9
5
7