Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनिवडनोकरीब्रेकिंगशैक्षणिकसत्कार

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

0 3 2 1 2 3

लक्ष्मण घुगे, राजापूर…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जाहीर होणाऱ्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी २०२४-२५ या वर्षात व्यावसायिक महाविद्यालयांमधून एकलहरे येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.यामुळे मातोश्रीच्या शिरपेचात अजून एक सन्मान वाढला आहे.
हा पुरस्कार विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कौशल्य, धोरणे, अध्यापन पद्धती, विद्यार्थी प्रगती, प्लेसमेंट यश, शिक्षकांचे अनुभव आणि संशोधन कार्य यांसारख्या अनेक महत्त्वाच्या निकषांवर आधारित दिला जातो. मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने या सर्वच निकषांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातून हा सन्मान पटकावला आहे.२००८ साली तीन शाखांसह सुरू झालेले हे महाविद्यालय आजच्या घडीला आठ शाखांतील पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयाने नाशिक जिल्ह्यात नॅक मानांकन मिळवणारे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय होण्याचा मान मिळवला आहे. तसेच पाच शाखांना एनबीए मान्यता मिळाल्याने हे महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात आदर्श ठरले आहे.यावर्षीपासून महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जाही प्रदान करण्यात आला आहे.नाशिक शहरापासून दूर,ग्रामीण भागात असूनही अत्यंत कमी कालावधीत स्वायत्तता दर्जा मिळविणारे महाविद्यालय म्हणून महाविद्यालयानलौकिक मिळविला आहे.
या प्रगतीचा श्रेय संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाला आणि प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला दिले जाते.त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनामुळे महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात नवी उंची गाठली आहे.शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.संस्थेचे संस्थापक नरेंद्र दराडे व अध्यक्ष आमदार किशोर दराडे यांनी या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा उत्कृष्ट पर्याय बनलेल्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर घातली आहे.

“मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आपली वेगळी छाप सोडली आहे. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा आदर्श बनलेले हे महाविद्यालय नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक दीपस्तंभ ठरले आहे. प्राचार्य डॉ. गजानन खराटे आणि त्याची टीम यांचे अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.”– कुणाल दराडे, सचिव-मातोश्री शिक्षण संस्था

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे