Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रसामाजिक

श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची १७ व्या दिवशी सांगता

यात्रौत्सवात २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज

0 3 2 1 2 3

श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची १७ व्या दिवशी सांगता

यात्रोत्सावाच्या कालखंडात १२ लाख भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक

यात्रौत्सवात २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज

शरद लोहकरे, लासलगाव….

नाशिक -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे ता.निफाड येथील ग्रामस्थांचे अराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला होता.या निमीत्ताने यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसी श्री मतोबा महाराजांची महापुजा व रथपुजा असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निफाडचे आमदार दिलीपराव बनकर सौ.मंदाकिणी बनकर , सुवर्णकार अभिषेक घोडके ,सौ.सुवर्णा घोडके यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली होती तर श्री मतोबा महाराज की जय.. या जय घोषात दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते रथ पुजन करुन रथ मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला होता. अतिशय मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थित यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला होता हा उत्सव अखंड १७ दिवस सुरु होता,यात्रोत्सवाच्या १७ दिवसात जवळपास २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर यात्रोत्सव कालखंडात १२ लाख भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्त झाले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

दरवर्षा प्रमाने याही वर्षी पौष पोर्णिमेला नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला होता.१३ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मंदिरात श्री मतोबा महाराजांची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मतोबा महाराजांची प्रतिमा ठेवलेल्या व सजविलेल्या रथाची गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक संपन्न झाली.यावेळी मिरवनुकीत गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी आपापली सजविलेली बैले. रथास जुंपून घेत होते.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक ,क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा नैताळे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला होता श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरु होताना पहाटे पासुनच भाविक मोठ्या प्रमानावर मंदिरात दर्शनास गर्दी करुन होते.सकाळी महापुजेच्या वेळी रांगेत दर्शन घेत असताना गोपेगाव ता.दिंडोरी येथील भाविक जगन्नाथ शंकर कावळे व लक्ष्मीबाई जगन्नाथ कावळे यांना महापुजेप्रसंगी पुजेचा मान मिळाला होता.

यात्रोत्सव काळात कायदा सुव्यस्थेचे पालन व्हावे. कोणत्याही कारणाने शांततेचा भंग होऊ नये म्हणून निफाडचे पोलीसा उपअधिक्षक निलेश पालवे व पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये व वाहतुक सुरळीत चालु रहावी म्हणून निफाड पोलिसानी विशेष परिश्रम घेतले. यात्रोत्सव काळात कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये व भाविकांचे ,ग्रामस्थांचे ,व्यावसायिकांचे आरोग्य व्यवस्थित रहावे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी सुजित कोशिरे व नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी डाँ. पुरुषोत्तम चारुडे डाँ.सूरज टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण आरोग्य खात्याच्या टीमने विशेष काळजी घेतली.

यात्रोत्सवाची महाआरतीने सांगता
काल (दि.२९ ) संध्याकाळी ७ वाजेच्या महाआरतीने यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे ,नायब ताहसिलदार राहुल मुळीक ,सहाय्यक महसुल अधिकारी शरद घाडगे, डाँ.सुजित गुंजाळ ,अश्विनी गुंजाळ,तलाठी शंकर खडांगळे ,पुजा खडांगळे या मान्यवरांसाह व दर्शन रांगेतील भाविक ,अशोक सार्जल ,त्रंबक निकम ,प्रशांत आरोटे ,दिपक दरगोडे यांच्या हस्ते महाआरतीने सांगता झाली. पुजारी म्हणुन हरी बोरगुडे ,गणेश बोरगुडे ,मारुती साळुंके ,केशव महाराज बोरगुडे ,कृष्णा कोटकर यांनी सेवेकरी म्हणून काम बघितले.

प्रत्येक भाविकांचे वेळेत दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगेचे नियोजन केले होते .भाविकांसाठी मंदिराबाहेर पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.ग्रामस्थ ,भाविक ,पोलिस ,यांनी वेळोवेळी मंदिर व्यावस्थापनाला सहकार्य केले यावर्षी मंदिर परिसरात कोणताई गागाट-गोंधळ होणार नाही याची सर्वानी दक्षता घेतली त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता कोणीही यात्रोत्सावात शांततेचा भंग होऊ दिला नाही.
नामदेव बोरगुडे
अध्यक्ष- श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट

श्री मतोबा महाराजांचा संपुर्ण यात्रोत्सव अतिशय आनंदात आणि उत्सहात संपन्न झाला यात्रा कालाखंडात सर्व ग्रामपंचायात सदस्य ,देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ ,ग्रामस्थ , पोलिस ,व्यावसायिक,भाविक , यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत व्यावस्थापनास मदत केली आहे.संपुर्ण गावात स्वच्छता राहावी म्हणुन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम केले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरुसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.यात्रोत्सवात किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सर्व घटकांचे सहकार्याबद्दल आभारी आहे.
निशा पाठक -सरपंच
राजू पठाण -यात्रा कमेटी चेअरमन
ग्रामपंचायत नैताळे/रामपुर

 

1/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे