Breaking
अपघातई-पेपरसामाजिक

स्वप्निल टापसे यांचा भिषण अपघातात दुर्देवी मृत्यू..

भैय्या ची ती रात्र ठरली वैर्याची..

0 4 2 9 5 7

स्वप्निल टापसे यांचा भिषण अपघातात दुर्देवी मृत्यू..

भैय्या ची ती रात्र ठरली वैर्याची..

सुनील क्षिरसागर दि.१३, विंचूर (नाशिक) : ती सायंकाळ म्हणजे दि.९ जुलै २०२५ बुधवार ची सायंकाळचे ६:३० वाजेची वेळ स्वप्निल टापसे यांना ठरली अखेरची.. असा अंगाचा भयावह थरकाप करणारी ही घटना. नाशिक येथील वाडीवह्रे येथील व्हीटीसी चौफुली जवळ घडली.
स्वप्निल हा जॉब करत असताना इगतपुरी वरून घरी परतत असतांना वाडीवह्रे येथील पेट्रोल पंपावर मोटर सायकल ला पेट्रोल भरले आणि आत्ताच दीड महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते,आणि पत्नीला त्याने ६:०० वाजता फोन करून सांगितले मी अर्ध्या तासात घरी येतो, आणि त्याचा तो फोन अखेरचाच ठरला.आणि पुढे जात असताना व्हीटीसी जवळ स्पीड ब्रेकर जवळ त्याला अज्ञात वाहनाने पाठीमागुन मागून इतकी जबर धडक दिली. आणि अशा परिस्थितीत तो रस्त्यावर दोन ते अडीच तास पडलेला होता. त्याला कोणीही मदतीला धावून आले नव्हते.आणि रात्री ८:०० वाजता त्याला रुग्णवाहिका घ्यायला आली पण त्यावेळेस स्वप्नील या जगाला सोडून गेला होता. नंतर शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. हा अपघातच इतका भीषण होता अंगाचा थरकाप करणार होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.स्वप्निल चे वय ३४ वर्ष त्याचे बालपण विंचूर येथे सुनील क्षिरसागर या मामाच्या गावी गेले.कारण स्वप्नील ची आई सुद्धा (कै. निता टापसे) ह्या तो तीसरीत असतानाच त्याला सोडून गेल्या होत्या. आणि त्याचे सर्व शिक्षण संगोपन मामाकडे झाले. आणि उर्वरित शिक्षण नाशिक येथे मावश्या कडे स्वाती वटारे व ज्योती वारे यांच्याकडे राहुन, ब्रह्मा व्हॅली त्रंबकेश्वर येथे एम बी ए पूर्ण केले होते.
या घटनेमुळे वारे, वटारे, क्षीरसागर व टापसे कुटुंबीयावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्वप्निल च्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ, मामा, मामी, मावश्या, काका, मामे भाऊ , मावस भाऊ, भावजाई, पुतणी असा परीवार आहे. तसेच या परीवारा कडून अशी मागणी होत आहे कि, सदर हा अपघात झाला ते वाहन कुणी बघीतले असेल तर या मोबा. ९८२२५८५३०५ नंबर वर संपर्क करावा अशी दुःखद अंतःकरणाने मागणी केली आहे.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे