रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमा

किरण घायदार : रांगोळी आपल्या संस्कृतीची खरी तर ओळख आहे. सकाळी उठले की महिला नियमितपणाने घराच्या समोर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतात त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढली जाते, पण अलीकडे रांगोळीच्या माध्यमातून मातून विविध प्रकारचे सण, उत्सवाच्या निमित्ताने रेखाटन घडू लागले आहे. आज असणाऱ्या रामनवमीच्या निमित्ताने माधुरी पैठणकर या महिला कलाकाराने प्रभू रामचंद्राची प्रतिमा रांगोळीतून रेखाटली आहे.
रामनवमी साजरी करण्यासाठी अगदी एक दिवस उरला आहे. देशभरात रामनवमीची तयारी जोरात सुरू झाली आहे. हिंदू देवता, भगवान श्री रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या व सर्वत्र रामनवमी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. देशाच्या इतर भागांतील भक्त देखील उत्सुक आहेत. हा उत्सव विशेष बनवण्यासाठी विशेषतः ‘जय श्री राम’ प्रतिमा विविध स्वरूपात रेखाटनेचे प्रयत्न देशभरात केले जात आहेत. या माध्यमातून आपली कला प्रदर्शित करण्याचा होणारा प्रयत्न कौतुकास्पद मानला जातो. त्याच प्रकारे रांगोळी डिझाइन काढणे हा रामनवमी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. रामनवमी निमित्त खास रामाची प्रतिमा असलेल्या काही रांगोळी काढू शकता. राम नवमीसाठी रांगोळी डिझाइन, ‘जय श्री राम’ प्रतिमा, श्री राम नवमी विशेष रांगोळी, राम नवमीसाठी नवीनतम रांगोळी डिझाइन, अयोध्या राम मंदिर प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन करण्यात आल्या आहेत.
राम नवमीच्या दिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येतात. आजकाल आपण सजावटीसाठी अनेक
गोष्टींची मदत घेतो. कोणताही सण किंवा शुभ समारंभ आला की आपण घराच्या वेगवेगळ्या भागात रांगोळी काढतो. तुम्ही तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात चमच्याने, थाळीच्या मदतीने सहज बनवले जाता आहेत. या संदर्भात माधुरी पैठणकर यांच्याशी संवाद झालेल्या संवादातून त्या म्हणाल्या की, प्रभू श्रीरामाची रांगोळी डिझाइन जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढायची असेल तर या प्रकारची फ्लोरल डिझाइन रांगोळी योग्य असेल. यासाठी ४ ते ५ रंगांचे कलर कॉम्बिनेशन निवडावे लागेल. फुलांच्या कळ्या काढण्यासाठी माचीस वापरता येईल. रांगोळी काढण्यात एक्सपर्ट असाल आणि तुमच्या घरातील मंदिरात वेगवेगळ्या रंगांच्या साहाय्याने रांगोळी काढण्याचा विचार करत असाल, तर अशा प्रकारे तुम्ही प्रभू श्रीरामाचे चित्र देखील बनवू शकता. तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात श्रीराम मंदिराची झलक दाखवायची असेल तर तुम्ही गोल आकारात डिझाईन बनवू शकता, चमचा किंवा माचीस वापरून त्यास योग्य आकार देऊ शकता. चित्राप्रमाणे तुम्हाला श्री राम मंदिर बनवता येईल. श्रीराम असेही लिह शकता. हवे असल्यास बॉर्डरसाठी रंगीबेरंगी फुलेही बनवू शकता. हे करण्यासाठी, आपण प्लेटची मदत घेऊ शकता. रांगोळीची सोपी आणि सुंदर डिझाईन काढायची असेल तर अशा प्रकारे धनुष्य बाणाची डिझाईन काढू शकता. त्यामध्ये ‘जय श्री राम’ असं देखील लिहू शकता. त्यासाठी पांढरा आणि भगवा या दोन रंगांच्या मदतीने ते बनवण्याचा प्रयत्न करा,असेही रांगोळी आर्टिस्ट माधुरी पैठणकर यांनी सांगितले.
■ ग्रामीण भागामध्ये रांगोळी संस्कृती जोपासण्याचे काम मोठ्या प्रमाणावर घडते आहेत. नव्या पिढीसाठी विविध प्रकारच्या रेडीमेड वस्तू बाजारात मिळू लागलेल्या आहेत. त्यामुळे बोटांवर, हातावर असलेली कला विकसित होण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र बोटाच्या माध्यमातून कला जोपासण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या अवतीभोवती घरात असलेल्या वस्तूंचा आधार घेत आपण अत्यंत सुंदर आणि देखण्या रांगोळ्या निर्माण करू शकतो. उत्तम रांगोळी काढता आली तर तो रोजगाराचा भाग बनेल. त्यातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील महिला, पुरुषांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
माधुरी पैठणकर