Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक

लासलगाव डेपोला मिळाल्या आणखी 5 बसेस

0 3 2 1 2 3

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे….लासलगाव बस डेपोमध्ये पुन्हा पाच नवीन बसेस दाखल*

*लासलगाव बस डेपोला एकूण २५ बसेस उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा*

*नाशिक,दि.२१ मार्च:-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या आठवड्यात लासलगाव बस डेपोमध्ये ५ नवीन बसेस दाखल झाल्या आहे. त्यानंतर आज पुन्हा ५ नवीन बसेस लासलगाव डेपोमध्ये दाखल झाल्या आहेत. प्रवाश्यांचा प्रवास होणार अधिक सुखकर होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी २५ बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार लासलगाव बस डेपोला टप्याटप्प्याने अधिक बसेस लवकरच उपलब्ध होणार आहे. 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे राज्य परिवहन येवला व लासलगाव आगारास नवीन बसेस देण्याची मागणी केली होती. त्यानुसार लासलगाव बस डेपोला आत्तापर्यंत एकूण १० बसेस प्राप्त झाल्या आहे. त्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहे.

येवला मतदारसंघातील राज्य परिवहन विभागाच्या लासलगाव (जि. नाशिक) आगारात ५६ पैकी २२ बसेस नादुरुस्त झाल्या असून केवळ ३४ बसेस सेवेत होत्या. कोरोनापूर्वी लासलगाव बस आगारात ५६ बसेस या प्रवाशांच्या सेवेसाठी होत्या. मात्र आत्ता फक्त ३४ बसेस लासलगाव सेवेत होत्या. बाकी स्क्रॅप झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. बसेसच्या कमी संख्येमुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक बस या वेळेवर सुटत नाही किंवा अचानक रद्द केल्या जातात. यामुळे विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्ग आणि इतर प्रवाशांना वेळेत पोहोचता येत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या.

बस आगारातून पूर्वी नाशिककरिता दर अर्ध्या तासाने बस सेवा सुरू होती व तीच बस नाशिक आगारातून परत लासलगावकरिता परत येत होती. त्यामुळे किमान १५ ते २० फेऱ्या बसेसच्या लासलगाव ते नाशिक होत होत्या. त्या पूर्णतः बंद झाल्या होत्या. आशिया खंडात कांद्यांची मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेली लासलगाव बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागातून व्यापारी व कांद्याशी संबंधित असणाऱ्यांची वर्षभर ये-जा चालूच असते. लासलगाव हे चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, नाशिक, पिंपळगाव, निफाड यासारख्या मोठ्या व्यापारी तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु बसेसच्या कमी संख्येमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लासलगाव येथील बस सेवा ही पूर्वीच्या शंभर टक्के च्या तुलनेत केवळ दहा टक्केच प्रवासी वर्गाला दिली जात आहे. लासलगाव व येवला डेपोला तात्काळ बसेस किमान प्रत्येकी २५ बसेस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे