Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

गल्फ ऑइलतर्फे नाशिकमध्ये चाय- पकोडा राइड २०२५ चा शुभारंभ

भारतात बायकिंग संस्कृती रूजवण्याची तीन वर्ष इंडिया बाइक वीकच्या सहकार्याने साजरी करणार

0 4 2 9 5 8

गल्फ ऑइलतर्फे नाशिकमध्ये चाय- पकोडा राइड २०२५ चा शुभारंभ

भारतात बायकिंग संस्कृती रूजवण्याची तीन वर्ष इंडिया बाइक वीकच्या सहकार्याने साजरी करणार

  • इंडिया बाइक वीक २०२५ गल्फसह भागिदारी मजबूत करत असून २० पेक्षा जास्त शहरांत राइडचे आयोजन करण्यात येत आहे

  • देशभरातील सिग्नेचर राइड्सद्वारे गल्फ ऑइलची भारतात वेगाने उदयास येत असलेल्या बायकिंग संस्कृतीप्रती बांधिलकी अधोरेखित

  •  नाशिक– गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ल्युब्रिकंट ब्रँड्सपैकी एका ब्रँडने त्यांच्या लोकप्रिय चाय- पकोडा २०२५ राइडचा नाशिकमध्ये शुभारंभ केला. मुख्य प्रायोजक इंडिया बाइक वीक (आयबीडब्ल्यू) या आशियातील सर्वात मोठ्या मोटरसायकलिंग फेस्टिवलसह ही रेस आयोजित करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या वर्षाच्या राइड्स परत एकदा मोटरसायकिंगच्या माध्यमातून साहस आणि सामाजिक भावनांना चालना देत आहे. गेल्या दोन वर्षांत या रेसला १२००० पेक्षा जास्त रायडर्स आणि २० पेक्षा जास्त शहरांतील मोटरसायकलप्रेमींचा प्रतिसाद मिळाला असून ही राइड देशातील बहुप्रतीक्षीत सामाजिक स्वरुपाचा बायकिंग अनुभव देणाऱ्यांपैकी एक ठरली आहे.

यावर्षी नाशिकच्या राइडमध्ये १०० पेक्षा जास्त बायकर्स सहभागी झाले होते. नाशिकच्या ट्रीट हॉटेलपासून सुरुवात करत त्यांनी सुमा अडव्हेंचर पार्कपर्यंत ३० किमीचा प्रवास पूर्ण केला. साहस आणि एकत्रितपणाचा आनंद यामुळे ही राइड अविस्मरणीय ठरली. सुरक्षेवर भर देत गल्फने आयबीडब्ल्यू मार्शल्ससह प्री- राइड ब्रिफिंग आणि सेफ्टी ड्रिलचे आयोजन केले होते. मार्शल्सनी आघाडीवर राहात राइड सुरळीतपणे पार पडेल याची काळजी घेतली. प्रत्येक रायडरला सेफ्टी रायडिंग गियर देत ब्रँडने सुरक्षित व जबाबदार रायडिंगप्रती आपली बांधिलकी दर्शवली. या कार्यक्रमाची सांगता राइड संपल्यानंतर वेगवेगळे मजेदार उपक्रम आणि संवादी खेळातून झाली. मोटरसायकलिंगची१ एकत्रित संस्कृती दर्शवण्यासाठी खास क्षणांना उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. रवी चावला म्हणाले, ‘चाय- पकोडा राइड्स बायकिंगप्रेमींसाठी जणू परंपरा बनली आहे आणि या वर्षी परत एकदा नाशिकमध्ये या अविस्मरणीय अनुभवाची निर्मिती करताना आम्हाला आनंद होत आहे. इंडिया बाइक वीकसह आमची भागिदारी गल्फची वाहतुकीत सुधारणा करण्याची तसेच रायडर्समध्ये पॅशन, स्वातंत्र्य आणि एकीची भावना रूजवण्याची बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. ग्राहकाला प्रथम प्राधान्य देणारी कंपनी या नात्याने हे अनुभव आम्हाला ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्यासाठी तसेच रायडर्सना गल्फची कामगिरी व विश्वासार्हता यांचा खरा अनुभव देण्यासाठी मदत करतात. रायडर्सनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करणे आणि त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षणांची निर्मिती करणं महत्त्वाचं आहे.’

इंडिया बाइक वीकचे हे १२ वे वर्ष असून हा ब्रँड देशात मोटरसायकलिंग संस्कृती साजरी करण्यासाठी ओळखला जातो. रायडर्स एकमेकांसह बायकिंगचा आनंद घेण्यासाठी आणि खुल्या रस्त्यांवर आपल्या पॅशनचा अनुभव घेण्यासाठी यात सहभागी होतात. चाय- पकोडा राइड्स आपले अस्तित्व विस्तारत आहेत, बायकर्सना निसर्गरम्य रस्त्यांचा अनुभव घेण्याची, चहाबरोबर गप्पांचा आनंद घेण्यासाठी व बायकिंगचे प्रेम इतरांबरोबर शेयर करण्याची संधी देत आहे.

इंडिया बाइक वीकच्या बिल्ड- अप उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असलेल्या चाय- पकोडा राइड्स यापुढेही आणखी व्यापक व लोकप्रिय होत राहातील. वेगवेगळ्या शहरांतील आयोजनाद्वारे गल्फला बायकिंग कम्युनिटीपर्यंत पोहोचण्याची संधी यामुळे गल्फला मिळत आहे. गल्फच्या सहकार्याने या राइड्स एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या ठरत आहेत. रस्ते सुरक्षा, साहस व कम्युनिटीशी संवाद यांसह या राइड्स अविस्मरणीय ठरत असून गल्फला भारतातील बायकिंग कम्युनिटीसह थेट नाते जोडण्यासाठी दमदार प्लॅटफॉर्म मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे