छत्रपती सेना आदर्श शिवजन्मोत्सव -2025 भूमिपूजन संपन्न

छत्रपती सेना आदर्श शिवजन्मोत्सव -2025
भूमिपूजन संपन्न
नाशिक /किरण घायदार
नाशिक जिल्ह्यातील एकमेव आदर्श शिवजन्मोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती सेनेच्या उत्सव स्थळाचे भूमिपूजन सुरगणा संस्थान चे श्री आतिषराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,
शिवतिर्थ, जिल्हा न्यायालय समोर, नाशिक येथे संपन्न होणार्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली असून यावर्षी प्रथमच भव्य हिरकणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दरवर्षी प्रमाणे शिवकालीन इतिहासातील प्रमुख घटनांवर आधारित वस्तूंचे विश्वविक्रमातील पुढील विक्रम , रायगडावरिल जगदिश्वर मंदीराची,निष्ठेची पायरी, साकारली जाणार आहे. सर्व वयोगटातील घटक या सोहळ्यामधे सहभागी व्हावेत आणी सर्वांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देश्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दिनांक 16 फेब्रुअरी पासून सुरु होणार्या कार्यक्रमासाठी केल्या जाणार्या मंडप व कार्यक्रम स्थळाचे ,शिवतिर्थ चे विधिवत पूजन दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते. याप्रसंगी सुरगणा संस्थान चे आदरणिय आतिषराजे पवार, श्री वैभव सोनार, श्री सुरेशअण्णा शेलार , शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षा शिल्पाताई सोनार, छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष श्री चेतनभाऊ शेलार, मार्गदर्शक श्री निलेशभाऊ शेलार, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती सेनेचे कोअर टिम अध्यक्ष डॉ जयेंद्र थविल, प्रदेशाध्यक्ष श्री राजेशभाऊ पवार,शिक्षक आघाडी प्रदेशप्रमुख श्री सुनील देशमुख, डॉक्टर आघाड़ी चे डॉ श्याम थविल, वकिल आघाडी चे ॲड राजाभाऊ ठाकरे, विद्यार्थी आघाड़ी, महीला आघाडी , उद्योजक आघाडी, मुस्लिम आघाड़ी, शेतकरी आघाडी, सर्व महानगर प्रमुख, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष व सर्व सदस्य,शिवप्रेमी उपस्थित होते.