ई-पेपरक्रिडा व मनोरंजनसामाजिक
पृथ्वीराजचा राज्याभिषेक आणि राजा सोमेश्वरचा वारसा पुढे नेण्याबाबत मनोगत व्यक्त करत आहेत पद्मिनी कोल्हापुरे
UDYAM-MH-23-0313678
0
4
2
9
5
7
पृथ्वीराजचा राज्याभिषेक आणि राजा सोमेश्वरचा वारसा पुढे नेण्याबाबत मनोगत व्यक्त करत आहेत पद्मिनी कोल्हापुरे
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेत भारतातील एका महान राजाच्या उदयाची कहाणी उलगडत आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे आणि मालिकेत राजा सोमेश्वरच्या दुःखद निधनानंतर, अजून किशोरवयात असलेल्या पृथ्वीराजच्या राज्याभिषेकाचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे.
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसाठी या मालिकेत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. या मालिकेत ती कुलीन आणि खंबीर राजमातेच्या भूमिकेत आहे. राजा सोमेश्वरच्या रूपात तिने अलीकडेच आपला मुलगा गमावला आहे, पण शोकमग्न न होता, ज्याचा लवकरच राज्याभिषेक होणार आहे, त्या आपल्या नातवाच्या पाठीशी तिला खंबीरपणे उभे राहावे लागणार आहे. भावनांनी ओतप्रोत असलेला हा कथाभाग एक शासक म्हणून पृथ्वीराजच्या प्रवासाची सुरुवात दर्शवतो, तसेच राजमातेचे सामर्थ्य आणि चिवटपणा देखील दाखवतो.
आपले विचार व्यक्त करताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “राजमाता म्हणून, मला एक अशी स्त्री उभी करायची होती, जी आपल्या मुलाच्या, राजा सोमेश्वरच्या मृत्यूमुळे मनातून कोसळली आहे, पण तरीही आपल्या नातवाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, कारण समस्त राज्य आता पृथ्वीराजकडे आशेने बघत आहे. वेदना आणि अभिमान या दोन्ही भावना अभिव्यक्त करणे सोपे नव्हते. पण एक अभिनेत्री म्हणून मला समाधान देणारे होते. एक जुनी म्हण आहे की, ‘काहीतरी भव्य दिव्य घडण्यासाठी, कसला तरी अंत व्हावाच लागतो.” या कथेत आत्ता नेमके हेच घडले आहे. राजा सोमेश्वरच्या निधनामुळे या राज्याच्या इतिहासाचा एक अध्याय संपला, पण तेथूनच एक शासक आणि प्रजेचा संरक्षक म्हणून पृथ्वीराजच्या प्रवासाची सुरुवात झाली. पृथ्वीराजची भूमिका करणारा उर्वा सावलिया खूप प्रतिभावान मुलगा आहे. त्याच्या अभिनयात एक प्रामाणिकपणा आहे, जो दुर्मिळ असतो. तो जेव्हा त्याच्या भावपूर्ण डोळ्यांनी तुमच्याकडे पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातील भावना खऱ्या वाटतात, नाटकी वाटत नाहीत. माझा पहिल्यापासून हा विश्वास होता की, तुमच्या जीवनात काही भूमिका अशा येतात, ज्या तुम्हाला दबावाखाली असतानाही शांतपणा, स्थिरता आणि उमदेपणाची ताकद दाखवतात. माझ्यासाठी राजमाता ही तशीच एक भूमिका आहे.”
एक शक्तीशाली इतिहास उलगडताना बघा, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
0
4
2
9
5
7



