Breaking
सामाजिक

लासलगाव येथून दोन युवक मोटरसायकलवर चारधाम यात्रेसाठी रवाना

0 4 2 9 5 7

अभय पाटील..

लासलगाव म्हटले की बाबा अमरनाथ ग्रुप यांच्यामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या बाबा अमरनाथ यात्रा उत्सव. त्यामुळे लासलगावला यात्रेला जाणाऱ्या भाविकांची उत्सुकता बघायला मिळते. 

तसेच आज दोन युवक लासलगांव येथून चारधाम यात्रेसाठी रवाना झाले असून भूषण वाळेकर, भाऊसाहेब ( आप्पा) केदारे राहणार लासलगाव हे दोन युवक प्रथमच चारधाम यात्रेसाठी मोटरसायकलवर निघाले आहे. 

त्यांचा प्रवास हा लासलगाव येथून सुरू होऊन  चांदवड रेणुकामाता दर्शन, गणपती मंदिर दर्शन, उज्जैन महाकाल दर्शन, आग्रा,मधुरा,दिल्ली,हरिद्वार, देहरादून, मसुरी, यमुनोत्री उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, ब्रदीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार असा ४२०० किलोमीटर एक महिना प्रवास असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी चार भाविकांनी मोटरसायकल द्वारे उत्तराखंडची (चारधाम) यात्रा पूर्ण केली त्यात

लासलगांव व विंचूर मधून संदिप जगताप, अंचित पाटील, पप्पू पाटील, रामेश्वर भुताडा यांनी ही प्रथमच बाईकवर चारधाम यात्रा केली आहे.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे