शिवराज्याभिषेक सोहळा व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट नाशिकचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिक :
राजा शिव छत्रपती यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट, नाशिक महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन दि. ६ जून रोजी उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजा शिवछत्रपती व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या मुख्य विश्वस्त सौ. पंचशील गवळी यांनी वर्धापदिनानिमित्त संस्थेला रू. ११०००/- चा धनादेश संस्थेच्या सेक्रेटरी व आंतरराष्ट्रीय वेटलीफ्टर डॉ. गीता यादव यांच्याकडे सोपवला. संस्थेचे उपाध्यक्ष संजय जोशी यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयम एज्युकेशन ट्रस्ट नाशिक चे अध्यक्ष श्री. धोंडोपंत गवळी होते. या कार्यक्रमांस खजिनदार श्री. एस.एस. अमोदकर, श्री. राजू मुसळे, आदी गवळी, कु. प्रेरणा गवळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.