Breaking
गुन्हेगारीसामाजिक

कत्तलीसाठी जाणारी पाच गोवंश जनावरे पकडली

लासलगाव पोलिसांची कामगिरी

0 3 2 1 2 3

लासलगाव पोलिसांची महिनाभरात तिसरी गोवंश तस्करी संदर्भात कार्यवाही

२ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

शरद लोहकरे, लासलगाव 

लासलगाव पोलिसांनी पाठलाग करीत कत्तलीसाठी जाणारे पाच गोवंश जनावरे व एक छोटा हत्ती या वाहनासह २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लासलगाव पोलीस ठाण्यात पो.शि.सुजय बारगळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि.३० सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान विंचुर ते वेळापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर, आरोपी दत्तात्रय बुधाजी कोकाटे वय-३८ वर्ष रा.पालखेड मिरचीचे ता.निफाड याने त्याचे ताब्यातील टाटा एस. ई. कंपनीची छोटा हत्ती गाडी क्रं.एम एच १४ सी.पी.४६३२ हे वाहन संशयास्पद रीतीने वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला असता या वाहनामध्ये एकूण २४ हजार रु.किमतीचे गोवंश जातीचे तीन गायी व दोन गोऱ्हे हे निर्दयतीने कोंबुन, उपाशीपोटी, त्यांना इजा होईल अशा रितीने आखडुन बांधुन सदरची जनावरे ही कत्तल करण्याचे उद्देशाने विना परवाना वाहतुक करताना मिळुन आला. त्यामुळे आरोपी विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.३३७/२०२४ प्राण्यांना कुरतेने वागविण्याचा प्रतिबंध करणेबाबत अधिनियम, १९६० चे नियम ११(१)(ए)(बी) सह महाराष्ट्र प्राणिरक्षक अधिनियम १९९५ चे कलम ५(१) (ब) चे उल्लघंन ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.किशोर लासुरकर अधिक तपास करीत आहेत. गेल्या महिना भरात अवैध गोवंश वाहतूक पकडण्याची लासलगाव पोलिसांची तिसरी कार्यवाही असून १० लाख रुपयांच्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईने अवैध गो – तस्करी करणारांचे धाबे दणाणले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे