
0
4
2
9
5
7
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमार यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, 4 दिवसांपूर्वीच लग्न झालेले अनिकेत गौतम कांबळे, मेघना अनिकेत कांबळे हे नवविवाहित तरुण-तरुणी दोघे ही गंभीर जखमी आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमी नवविवाहित दम्पत्यला बार्शीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणायत आलं आहे. मिळालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार 26 नोव्हेंबर रोजी अनिकेत आणि मेघना ह्या दोघांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दोघांना घेऊन कुटुंबीय देवदर्शनसाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र, अचानक कार आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली आहे. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.
0
4
2
9
5
7


