कृषीवार्तामहाराष्ट्र
मोगरे येथे भुईमुग पिकावर शेतीशाळा

0
3
2
1
2
3
मोगरे येथे भुईमुग पिकावर शेतीशाळा
इगतपुरी ( प्रतिनिधी )
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र ,नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील मोगरे येथे रबी हंगाम २०२४-२५ साठी भुईमुग पिकावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे अधिकारी ऋषिकेश मानकर यांनी भुईमुग पिकलागवडीसाठी लागणारे मार्गदर्शन व विविध प्रकारचे सापळे यांचे प्रात्यक्षिका सहित रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. फवारणी करताना वापरण्यात येणारी संरक्षण (आय पी एम) किट, गम बुट, इन्सेक्ट नेट यांचे प्रात्यक्षिक घेऊन वाटप करण्यात आला. रासायनिक किटकनाशकांच्या अशास्त्रीय वापरमुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच उत्पादन खर्चातही खूप वाढ झालेली आहे. या द्रुष्टचक्रातून वेळीच बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मार्ग अंगीकार करणे आजच्या काळाची गरज झाली आहे. यासाठी मशागतीय, यांत्रिक ,जैविक व रासायनिक या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच त्याच बरोबर फक्त रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होते असे मानकर म्हणाले. कृषी सहायक रुपाली बिडवे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी प्रताप जाखेरे, उपसरपंच योगिता दीपक उघडे, विशाल काशिद, प्रगशील शेतकरी भगवंता लाव्हरे, देवराम केरू, गवारी, विलास, जाखेर, जयराम जखेरें, आनंदा गवारी, ज्ञानेश्र्वर जखेरि दीपक जखेरी तसेच गावातील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
0
3
2
1
2
3