विशालने लक्ष्य मेहताला ठणकावले: ‘हे इंडियन आयडॉल आहे…
विशालने लक्ष्य मेहताला ठणकावले: ‘हे इंडियन आयडॉल आहे, यात तुम्ही नक्कल करून पुढे जाऊ शकणार नाही”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोच्या 15 व्या सीझनच्या ऑडिशनमध्ये अलीकडे थोडे नाट्य घडले. अमृतसरच्या लक्ष्य मेहताला परीक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला. बादशाह, श्रेया घोषाल आणि विशाल ददलानी या तिन्ही परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी या 23 वर्षीय तरुणाने ‘तुम क्या मिले’ आणि ‘पहली नजर में’ ही गाणी आपल्या गोड आवाजात सादर केली. पण या ऑडिशनमध्ये अचानक एक धक्कादायक वळण आले. सर्व परीक्षकांनी प्रसिद्ध गायकांची नक्कल केल्याबद्दल लक्ष्य मेहताची खरडपट्टी काढली.
Watch the video here: https://www.instagram.com/reel/DBHJGc2tKnL/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
त्याचा सुंदर आवाज आणि गायन कौशल्य यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, पण परीक्षकांनी त्याला आपल्या आदर्श गायकांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःच्या शैलीत गाण्याचा सल्ला दिला. सगळ्यात आधी विशालने लक्ष्यची ऑडिशन चालू असताना त्याला मध्येच थांबवले. त्याच्या आवाजातून त्याचा राग स्पष्ट जाणवत होता. लक्ष्यची खरडपट्टी काढत तो म्हणाला, “तू मूळ गायकांच्या लकबी स्वतःच्या गाण्यात दाखवत आहेस. आधी अरिजित आणि मग आतिफची नक्कल तू केलीस. तू स्वतः चांगला गात आहेस, पण तू स्वतःचे गात नाही आहेस. हे इंडियन आयडॉल आहे ना, यातून आयडॉल तयार होतात. इथे तुम्ही नक्कल करून पुढे जाऊ शकत नाही. तू लोकांसमोर गातोस, होय ना? बऱ्याचदा शोजमध्ये काय होतं की, जेव्हा तुम्ही इतर कलाकारांची नक्कल करता, तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांची दाद मिळते कारण त्यांनी ऐकलेली असतात, तशाच रूपात त्यांना गाणी ऐकायला आवडतात. पण, जोपर्यंत तू स्वतःची ओळख निर्माण करत नाहीस, तोपर्यंत तू स्टार होऊ शकणार नाहीस. इतर कुणाच्या तरी ढंगाने गाऊन तू इंडियन आयडॉल बनू शकणार नाहीस.”
त्यानंतर विशालने लक्ष्य आणि इतर स्पर्धकांना सल्ला दिला, “मला तुझा आवाज खरोखर आवडला, पण हे नक्कल करणे मला पसंत नाही. तू अवश्य शीक. हे मोठे कलाकार आहेत आणि चांगले कलाकार आहेत, पण ज्या दिवशी तू त्यांची नक्कल करू लागशील, त्यांच्याच शैलीत गाऊ लागशील तेव्हा तू हॉटेल, रेस्टॉरंटमध्येच गात राहशील. एक कलाकार म्हणून मोठे होण्यासाठी तुला तुझे स्थान शोधावेच लागेल.”
लक्ष्य इंडियन आयडॉलचा पुढील प्रवास करू शकणार का, याबाबत चाहत्यांना कुतूहल वाटते आहे. लवकरच बघायला मिळणार आहे इंडियन आयडॉल 15, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर. ते बघितल्यावरच तुम्हाला कळेल की लक्ष्य मेहता स्पर्धेत टिकून राहणार की नाही!



