मंत्री भुजबळ यांचे लासलगाव विंचूर गणेश दर्शन

*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव व विंचूर शहर परिसरातील गणेश मंडळांना भेटी*
*लासलगाव,विंचूर,दि.१५ सप्टेंबर :-* श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज लासलगाव व विंचूर शहर परिसरातील विविध श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी श्री गणेशाचे विधिवत पूजन करत मनोभावे दर्शन घेतले. तसेच यावेळी उपस्थित भाविकांना श्री गणेश उत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर शहरातील रायगड ग्रुप, एकलव्य ग्रुप, नवदुर्गा मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ, सिद्धीविनायक मित्र मंडळ, संत सेना मित्र मंडळ, विंचूर बाजार ग्रुप, आझाद मित्र मंडळ, भगवे वादळ ग्रुप, मुंजोबा मित्र मंडळ, युवा प्रतिष्ठान संभाजी चौक, भवानी पेठ मित्र मंडळ, पांडुरंग नगरचा बाप्पा, पोतनीस पार्कचा राजा, अष्टविनायक मित्र मंडळ तसेच लासलगाव येथील श्री गणेश मंडळ, गणेश नगर, श्री.संत नामदेव मंडळ,झेंडा चौक मित्र मंडळ, बाजारतळ मित्र मंडळ, स्वराज मित्र मंडळ, इच्छापूर्ती गणेश मंडळ, अहिल्या चौक यासह मंडळांना भेटी दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णाताई जगताप, रामनाथ शेजवळ, सचिन दरेकर, विलास गोरे, पांडुरंग राऊत, जयंत साळी, सोहेल मोमीन, राजेंद्र चाफेकर, ओम राऊत, महेंद्र पुंड, राहुल कर्पे, गोरख गांगुर्डे, बाळासाहेब ढवण, शंकरलाल सोनी, किशोर साळूखे, प्रमोद वाळूंज, संदीप देवरे, कृष्णा दारके, चमनराव सूर्यवंशी, महेश राऊत, अथर्व ढवण, भूषण रांधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.