Breaking
अपघात

झेलम एक्सप्रेसच्या इंजिनच्या धडकेने इसमाचा जागीच मृत्यू

0 4 2 9 5 7

चाळीसगाव – चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी हिरापूर रेल्वे कि.मी. नं. 319/1616 येथून रेल्वे लाईन ओलांडून जात असतांना त्यास ट्रेन नं. 11078 झेलम एक्सप्रेसच्या इंजिनचा जबर मार लागल्याने अंदाजे 30 ते 35 वयाचा इसम जागीच मयत झाला आहे. हा इसम अनोळखी असून या घटनेबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत झालेल्या इसमाचा चेहरा चेंदामेंदा झालेला आहे. बांधा मजबूत असून डोक्याचे केस काळे आहे. उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे.
इसमाने लाल रंगाचा त्यावर टेलमार्क ट्रु डबल एक्सेल रेडीमेड पॅन्ट निळ्या रंगाची जिन्स, फाटलेल्या अवस्थेत काळा बेल्ट, उजव्या हाताच्या मनगटावर ोंदलेले बांगडी टाईप नक्शी असलेलेल टॅटू अशा वर्णनाचा इसम असल्याचे चाळीसगाव पोलीसांनी सांगितले असून या इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्यास तपासी अंमलदार मो. 8999411978 किंवा रेल्वे पो.स्टेशन 02589-223584 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस हवालदार राहुल पाटील यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे