आरोग्य व शिक्षण
किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टीमचा शुभारंभ
0
4
2
9
5
7
किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टीमचा शुभारंभ
उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अत्यंत अचूकता देणारी मिसो रोबोटिक तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध
नाशिक, किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत MISSO – Advanced Robotic Joint Replacement System चे भव्य लोकार्पण केले. AI-आधारित, पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्यंत प्रिसिजन देणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता नाशिककरांसाठी उपलब्ध झाले असून, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेत सुरक्षितता, अचूकता आणि जलद रीकव्हरीचे नवे पर्व सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे वरिष्ठ पदाधिकारी, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट तज्ञ डॉक्टर आणि मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी किम्स मनवता हॉस्पिटलचे डायरेक्टर व चीफ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. राज नगरकर म्हणाले, किम्स मनवता हॉस्पिटल नेहमीच जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान नाशिकमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आले आहे. MISSO रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टममुळे आम्ही ऑर्थोपेडिक कॅअरमध्ये आणखी एक ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. कमी ऊतक नुकसान, अत्यंत अचूकता आणि जलद रीकव्हरीमुळे रुग्णांना सर्वोत्तम परिणाम मिळतील. हे तंत्रज्ञान नाशिकला प्रगत शस्त्रक्रियेचे अग्रगण्य केंद्र म्हणून अधिक बळकट करते.
या विशेष प्रसंगी डॉ. प्रणित सोनवणे, कन्सल्टंट रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणाले मिसो तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील प्रत्येक मिलीमीटरचे अचूक नियोजन आणि स्थिर अंमलबजावणी शक्य होते. यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि लवकर चालणे सुरू करण्यास मदत होते.
पुढे अधिक माहिती देताना डॉ. स्पंदन कोषिरे, कन्सल्टंट रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणाले मिसो प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याची रचना लक्षात घेऊन वैयक्तिक शस्त्रक्रिया आराखडा तयार करते. त्यामुळे इम्प्लांटची परफेक्ट पोझिशनिंग होते आणि दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले मिळतात.
डॉ. मयूर पेखळे, कन्सल्टंट रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी मिसो रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट हे आधुनिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेत एक क्रांती आहे. हे तंत्रज्ञान मानवी चुका कमी करते, ऊतक नुकसान कमी करते आणि शस्त्रक्रियेची अचूकता मोठ्या प्रमाणात वाढवते. या विशेष प्रकाश टाकला.
MISSO अत्याधुनिक प्रणाली डॉक्टरांना खालील बाबतीत प्रगत मदत करते . अचूक बोन कट्स, AI-आधारित रिअल-टाईम डेटा, कमी ऊतक नुकसान, कमी वेदना व जलद रीकव्हरी, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह परिणाम देते.
या भव्य सोहळ्यात MISSO प्रणालीच्या मदतीने युनिलॅटरल रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट चे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना अत्याधुनिक प्रिसिजन सर्जरीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
0
4
2
9
5
7



