‘संगीत रजनी’ या सदाबहार मैफिलीत अजरामर गीतांनी रसिकश्रोते मंत्रमुग्ध
नाशिकरोड :- ” पन्नाकी तमन्ना है के, तुने ओ रंगीले कैसा जादू किया, दिल क्या करे, कोरा कागज था ये मन मेरा, उनसे मिली नजर, क्या खूब लगती हो, ओ मेरे दिल के चैन, छूकर मेरे मन को, ए दिल ए नादान, रोते हुए आते है सब, मेरी दुनिया है तुझमे कही, तू मुझे जान से भी प्यारा है, धीरे धीरेसे मेरी जिंदगीमें, तुझसे नाराज नही जिंदगी, समा है सुहाना सुहाना, तुम जो मिल गये हो, लेकर हम दीवाना दिल, आपकी आखोमे कुछ, सून बेलिया शुक्रिया मेहरबानी, मी रात टाकली मी कात टाकली, रुपेरी वाळूत , ” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाणी रम्य सायंकाळी गायकांनी सादर करून रसिकांची मने जिंकली.
निमित्त होते ते नाशिकरोड येथील संविधान कराओके टीमवतीने कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार ‘ संगीत रजनी ‘ चित्रपट गीतांचे रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस जिमखाना हॉल येथे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचा प्रारंभी बुद्धमूर्ती समोर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येऊन अस्मिता गादेकर हिच्या ‘ प्रथम नमो गौतमा ‘ या गाण्याने सुरुवात करण्यात आली . या संगीत रजनी कार्यक्रमाचे संयोजन राजन गायकवाड व मीनाताई गांगुर्डे यांनी केले होते . स्वतः गायक राजन गायकवाड यासह रमाकांत गायकवाड, गौतम भदाणे, अशोक दिवे, संजय परमसागर, अजय चव्हाण, जयवंत गांगुर्डे, भरत भोई, सुनील मराठे, प्रदीप भावसार, सुनील डिंगोरे, ताहीर शेख, संजय देशपांडे, संजय दुलगज तसेच रूपाली तायडे, शिल्पा पगारे, वनिता आहेर, अस्मिता गादेकर, रितिका गायकवाड, मीना पाठक, नीता चव्हाण, शैलजा सोनार, सुधा घिल्डीयाल , सविता सहानी यांनी विविध गाजलेली सोलो, डुएट हिंदी व मराठी गाणी सादर केली . याप्रसंगी नाशिकरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, सीएनपी नोटप्रेसचे जन. सेक्रे. मनोज चिमणकर, आयएसपी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्रे, आयएसपी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, आरपीआयचे पवन क्षीरसागर , व्यावसायिक मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते . ध्वनी व्यवस्था सोहेल माणियार यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा पगारे व संजय परमसागर यांनी केले . सर्व उपस्थितांचे आभार रमाकांत गायकवाड यांनी मानले. मोहन पवार यांनी उत्कृष्ट पाच गायक,गायिकांना बक्षिसे देऊन कलाकारांचा आनंद द्विगुणीत केला . गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उस्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला .