क्रिडा व मनोरंजनसामाजिक
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ 4 जून पासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

0
3
2
1
2
3
रोनित रॉयच्या मते पडद्यावर एका शूर राजाच्या पित्याची भूमिका साकारणे हे प्रत्यक्षात पित्याची भूमिका निभावण्याक्षा फारसे वेगळे नाही
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होत आहे, एक भव्य ऐतिहासिक मालिका ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ – एका कोवळ्या राजकुमारामधून भारताचा अत्यंत पराक्रमी, योद्धा राजा बनण्याची ही कहाणी आहे, ज्याने बलाढ्य आक्रमणकर्त्यांना आपल्या सामर्थ्याने झुंज दिली. राजघराण्याच्या परंपरा आणि मूल्ये यांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चौहानची प्रारंभिक वर्षे उलगडतात. त्यातून त्याचे व्यक्तिमत्व, त्याची हिंमत आणि त्याच्यातील नेतृत्व गुण दिसतो. या कहाणीच्या मुळाशी पिता-पुत्राचा भावनिक प्रवास आहे, जो या महान यशोगाथेचा आत्मा आहे.
मालिकेत पृथ्वीराज चौहानच्या वडिलांची म्हणजे राजा सोमेश्वरची भूमिका करत आहे, ज्येष्ठ अभिनेता रोनित रॉय. आपल्या अभिनयाने त्याने या व्यक्तिरेखेला एक निःशब्द ताकद आणि भावनिक गहिरेपण दिले आहे. राजा सोमेश्वर एक अत्यंत सुजाण, सन्मान्य आणि बलशाली राजा आहे. पिता म्हणून आपल्या मुलाचा तो संरक्षक आहे आणि आपल्या मुलाचा त्याला सार्थ अभिमान आहे. रोनितच्या अभिनयामुळे मालिकेत खरोखर जान आली आहे. त्याने साकारलेला राजा हा केवळ एक अधिकारी व्यक्ती दिसत नाही, तर त्याच्यात एक पिता दिसतो, जो आज देखील संबद्ध वाटतो.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना रोनित रॉय म्हणतो, “पडद्यावर एका शूर राजाच्या पित्याची भूमिका साकारणे हे प्रत्यक्षात पित्याची भूमिका निभावण्याक्षा फारसे वेगळे नाही. सोमेश्वर हा केवळ एक राजा नाही. तो एक पिता देखील आहे, ज्याला आपल्या मुलासाठी जे जे उत्तम ते सर्व हवे आहे. मी स्वतः पिता असल्यामुळे या भावनांची कल्पना करण्याची मला गरज भासली नाही. मी त्या अनुभवू शकलो. एका पित्याला वाटणारा अभिमान, चिंता आणि आशा हे मी स्वाभाविकपणे अनुभवले. ही कहाणी ऐतिहासिक असली, तरी पिता-पुत्राचे नाते तर सार्वत्रिक आहे, कालातीत आहे. प्रत्येक पित्याला आपल्या मुलाच्या ताकदीत आपला अंश दिसत असतो. मी पडद्यावर हीच भावना आणण्याचा प्रयत्न केला. ही भूमिका करत असताना मला जे भावनांचे गहिरेपण जाणवते, तेच मालिका बघताना प्रेक्षकांनाही जाणवेल, अशी आशा आहे. या भूमिकेच्या माध्यमातून मी केवळ इतिहासाशी नाही तर अत्यंत मानवी भावनांशी जोडला गेलो.”
बघा, ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ 4 जून पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
0
3
2
1
2
3